पायोनियर पब्लिक स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन अत्यंत प्रेरणादायी वातावरणात आणि उत्साहात साजरा करण्यात आला.या वर्षी योग दिनाची अधिकृत संकल्पना होती – “Yoga for One Earth, One Health” – जी योगाचा संबंध नैसर्गिक समतोल, टिकाऊ आरोग्य आणि जागतिक कल्याणाशी जोडते.हीच संकल्पना केंद्रस्थानी ठेवून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या विशेष कार्यक्रमासाठी सामाजिक कार्य आणि विशेषतः योगसाधना क्षेत्रात मोलाचे कार्य करणाऱ्या आदरणीय योग शिक्षिका मा. रत्नप्रभा माळी मॅडम प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होत्या. त्यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली योगाचे विविध प्रकार — भ्रामरी, भस्त्रिका प्राणायाम तसेच सूर्यनमस्कार यांचे प्रभावी प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.
या प्रात्यक्षिकात त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहभागी झालेल्या आशा सलगर, उज्वला लेंडवे, सुजाता दिवटे, मंगल पाटील, मंगल चौगुले, मंदाकिनी येलपले आणि अरुणा पाटील यांनी विद्यार्थ्यांसमोर योगाभ्यास करून दाखवला. या सर्वांचे योगदान योग दिनाचे महत्त्व अधोरेखित करणारे ठरले.
रत्नप्रभा मॅडम यांनी योगाच्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक फायद्यांविषयी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.विद्यार्थ्यांनी त्यांच्या मार्गदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद देत मनापासून सहभाग घेतला.
या कार्यक्रमावेळी संस्थेचे अध्यक्ष मा. अनिल येलपले सर, पायोनियर पब्लिक स्कूलचे प्राचार्य श्री. सतीश देवमारे सर, पायोनियर निवासी गुरुकुलचे प्राचार्य डॉ. अमोल रणदिवे सर, तसेच शाळेच्या अकॅडेमिक इनचार्ज मृणाल राऊत मॅडम यांची विशेष उपस्थिती लाभली.मान्यवरांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून योगाचा दैनंदिन जीवनातील उपयोग आणि समाजकल्याणासाठीचे महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन शाळेच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने करण्यात आले. यावेळी सांस्कृतिक प्रमुख सौ. रुपाली गायकवाड मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.सूत्रसंचालन श्री. मयूर गौड यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रियांका मोहिते मॅडम यांनी केले.
विद्यार्थ्यांनी प्रचंड उत्साहाने सहभाग घेत योगाभ्यास केला. या उपक्रमामुळे त्यांच्यात शारीरिक व मानसिक आरोग्याबाबत जागरूकता निर्माण झाली आणि भारतीय सांस्कृतिक वारशाचा अभिमान देखील वृद्धिंगत झाला.
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक