डॉ. अविनाश खांडेकर, सतीशभाऊ सावंत, ह.भ.प.कृष्णाजी कदम यांना पाचेगाव येथे सत्कार समारंभ व मानपत्र देण्याचा कार्यक्रम 

0

दीपकआबा साळुंखे पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने पाचेगाव खुर्द येथे पायी दिंडीतील वारकऱ्यांना मोफत तपासणी व औषधोपचार : डॉ. राज मिसाळ

 सांगोला/प्रतिनिधी :दीपकआबा साळुंखे पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने पाचेगाव खुर्द येथे आषाढी एकादशीनिमित्त गोवा, कर्नाटक व महाराष्ट्रातून पायी दिंडीत जाणाऱ्या वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषधोपचार करण्यात येणार असून मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीच्या जिल्हाध्यक्षपदी डॉ. अविनाश खांडेकर वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष पंढरपूर विभागाचे विभाग प्रमुख सतीशभाऊ सावंत यांची निवड व पश्चिम महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध महाराज कीर्तनकार कृष्णाजी कदम यांचा मानपत्र देऊन सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती दीपक आबा साळुंखे पाटील चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष डॉ. राज मिसाळ यांनी दिली.

दीपकआबा साळुंखे पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने पाचेगाव खुर्द येथे सलग पंधरा वर्षे आषाढी वारीनिमित्त दिंडीतील वारकऱ्यांना मोफत आरोग्य तपासणी करून औषधोपचार करण्यात येतात. त्याचबरोबर ग्रामस्थांच्या वतीने चहा, नाश्ता, जेवणाची व्यवस्था केली जाते. चालू वर्षी 30 जून ते 4 जुलै अखेर पाचेगाव खुर्द येथे आषाढी वारीनिमित्त गोवा, कर्नाटक, महाराष्ट्रातून पायी चालत जाणाऱ्या दिंडीतील वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी दीपकआबा साळुंखे पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने करण्यात येणार आहे व पायी चालत जाणाऱ्या वारकऱ्यांना मोफत औषधोपचारही केले जाणार आहेत. त्याचबरोबर मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी डॉ. अविनाश खांडेकर यांची तर वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या पंढरपूर विभागाच्या प्रमुखपदी सतीशभाऊ सावंत व पश्चिम महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार रामाजी महाराज मठ मठाधिपती ह. भ. प. कृष्णाजी कदम ढालगावकर पंढरपूर यांचा दीपक आबा साळुंखे पाटील चारिटेबल ट्रस्ट व पाचेगाव खुर्द ग्रामपंचायत पाचेगाव विकास सेवा सोसायटी यांच्यावतीने मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान केला जाणार आहे 30 जून रोजी सकाळी 10 वाजता विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहितदादा यांच्यासह सांगोल्याचे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख, माजी आमदार ऍडव्होकेट शहाजीबापू पाटील माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते बाबुराव गायकवाड या मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.

 वारकऱ्यांची मसाज

 आषाढी एकादशी निमित्त वारकऱ्यांना परभणी मेडिकल कॉलेजच्या श्रावणी हायटेक इन्स्टिट्यूट व ॲक्युपंक्चर या संस्थेच्या वतीने मसाज केली जाणार आहे व वारकऱ्यांचे मसाज करून आयुर्वेदिक वेदनाशामक तेल वाटप केले जाणार आहे अशी माहिती दीपकआबा साळुंखे पाटील चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. राज मिसाळ यांनी दिली.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here