पालवी अग्रीकोच्या कृषीवीर आणि कृषीसखी योजनेला प्रचंड प्रतिसाद

0

सांगोला (तालुका प्रतिनिधी): कृषी क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे उत्पादन वाढवणे, खर्च कमी करणे आणि पर्यावरणावर होणारा परिणाम कमी करणे शक्य झाले आहे. अचूक शेती, ड्रोन, कृत्रिम बुद्धिमत्ता यांसारख्या तंत्रज्ञानाचा वापर शेतीत केला जात आहे.  ए.आय. तंत्रातून शेतीला मिळणार उन्नतीची जोड मिळणार असल्याचे माणगंगा परिवार आणि पालवी अग्रीकोचे संस्थापक नितीन इंगोले यांनी सांगितले. मंगळवेढा-सांगोला येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात पालवी अग्रीकोच्या कृषीवीर आणि कृषीसखी योजनेला कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.
शेतीसाठी लागणारी प्रत्येक गरज पुरविणारा आपल्या हक्काचा ए.आय.तंत्रज्ञानावर आधारलेला ई कॉमर्स प्लॅटफॉर्म घेऊन पालवी अग्रीको आला आहे. याच ई कॉमर्स प्लॅटफॉर्म सोबत पदवीधर युवक युवतींना जोडून घेऊन, पालवी अग्रीकोने कृषीवीर आणि कृषीसखी या रूपात व्यवसायाची अनोखी योजना आणली आहे.

या कामासाठी इच्छुक असलेल्यांना स्वतःच्या गावात, शहरात राहून काम करण्याची संधी मिळाली आहे. कृषीवीर आणि कृषीसखी यांना शेतकऱ्यांना प्लॅटफॉर्मची माहिती देऊन नोंदणी करायची आहे. सिझननुसार पिकांना लागणारी खते, बी बियाणे, कीटकनाशके, बुरशीनाशके, वनस्पती वाढ नियंत्रक व प्रवर्तके, संप्रेरके, तणनाशक, सूक्ष्म पोषणतत्वे, शेतीसाठी लागणारे अवजारे, स्प्रे पंप, हॅण्ड टूल्स, खुरपे, कोयता, विळा, ब्रश कटर, ताडपत्री, माल्चिंग पेपर, क्रॉप cover, डेअरी प्रॉडक्ट, पशुखाद्य, डिश कप, वासरांसाठी मिल्क फिडर बॉटल इत्यादी प्रोडक्ट तसेच, हवामान अंदाजा सह, पिकांवर पडलेल्या किंवा पडू शकणाऱ्या रोगांची ओळख करून देणारी सेवा पालवी अग्रीकोच्या ई कॉमर्सवर उपलब्ध आहे.


शेतकऱ्यांच्या बांधावर थेट कृषी साहित्य पोहोच करण्याची सुविधा देण्यात येत असून जर शेतकरी बांधवांना नको असेल तर, विनाशुल्क ते प्रोडक्ट रिटर्न करण्याची देखील सोय आहे. पालवी अग्रीकोच्या कृषीवीर होण्यासाठी तरुणांना ३४ हजार रुपये अनामत रक्कम जमा करावी लागणार असून यात त्यांना कंपनीमार्फत हाय क्वालिटीचा टॅब, टी शर्ट, मार्केटिंग मटेरियल, उत्तम क्वालिटीची बॅग, ओळखपत्र, व्हिजिटिंग कार्ड आणि सर्वोत्तम ट्रेनिंग मिळणार आहे. कृषीसखी होण्यासाठी युवतींना ७ हजार ५०० रुपये डिपॉझिट रक्कम भरायची आहे. ज्यात त्यांना, युनिफॉर्म, मार्केटिंग किट बॅग आणि शेतकरी प्रक्रियेसाठी लागणारे मार्केटिंग मटेरियल देण्यात येणार आहे. महाराष्ट्र, तामिळनाडू, कर्नाटक, केरळ, आंध्रप्रदेश, तेलंगणा , ओडिशा आणि पश्चिम बंगाल या आठ राज्यात व्यावसायिक उपस्थिती असणारा हा पालवी अग्रीकोचा ई कॉमर्स प्लॅटफॉर्म, मीरा या ए. आय. तंत्रज्ञानावर आधारलेला विश्वासू प्लॅटफॉर्म आहे.


पालवी अग्रीकोच्या मंगळवेढा येथील कार्यक्रमात कृषीवीर आणि कृषीसखी योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळाला यावेळी पालवी अग्रीकोचे टीम लीडर ओंकार लिगाडे, ऍग्री ॲडव्हायझर श्रीमती स्नेहल यादव, महादेव शिंदे, सतीश गायकवाड, तुषार इंगळे, दत्तात्रय शिंदे, संतोष गायकवाड, संजय शिंदे, चंद्रकांत सुरवसे, सचिन खांडेकर, दत्तात्रय शिंदे, बाळासाहेब पाटील, संतोष पाटील, सुरेखा डांगे, यादव मॅडम, शिला जाधव, ओम लिगाडे, अजित गोवे आदी उपस्थित होते.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here