महर्षी व्यास यांची जयंती व्यास पौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. लक्ष्मीदेवी शिक्षण संकुलात गुरुपौर्णिमेनिमित्त सरस्वती माता व पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन संस्था सदस्या सौ. रजनी भोसले व पर्यवेक्षक प्रा. सुभाष आसबे यांचे हस्ते करण्यात आले.
सुरुवातीला इ. 9 वी तील मुलींनी आपल्याला सध्या शिकवित असलेल्या सर्व गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त करून, या शाळेतील सर्वच शिक्षक आमचे जीवन सुखकर होण्यासाठी मन लावून अध्यापन करतात. या शाळेने आम्हाला आई जशी मुलाला जपते, तसेच सर्व आमची काळजी घेतात. आम्हाला चांगले सुसंस्कार देतात.आम्हाला यशाच्या शिखरावर घेऊन जाण्यासाठी येथील प्रत्येक घटक आमच्यासाठी महत्वाचा आहे.
या वेळी सहशिक्षिका सौ. निशिगंधा पोतदार यांनीही महर्षी व्यास यांचे महाभारतातील काही लेखन मुद्दे स्पष्ट करून सांगितले.
कार्यक्रमासाठी मुख्याध्यापिका सौ. पुष्पा महाकाळ, प्राचार्य हेमंत आदलिंगे, श्री. मनोहर गायकवाड, प्रा. आबासाहेब कोळी तसेच इतर सर्व शिक्षक, शिक्षिका हजर होते.
गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून आज इ. 1ली ते 8 वी पर्यंतच्या ज्या विद्यार्थ्यांनी अबॅकस वर्गासाठी प्रवेश घेतला आहे. त्याचे अबॅकस किट, टी शर्ट यांचे वाटप करण्यात आले. अबॅकस कोर्सबाबत विद्यार्थी व पालक यांच्या प्रतिक्रिया बोलक्या आहेत. कोर्समुळे गणित विषयाची भीती कमी झाली आहे. पूर्ण 7 लेवल पूर्ण केलेला विद्यार्थी स्कॉलरशिप व इतर स्पर्धा परीक्षेत कधीच मागे राहणार नाही.
अबॅकस कोर्स सौ. अर्चना बाबर व सौ. रत्नप्रभा शिंदे अतिशय छान घेत आहेत. त्याबद्दल संस्था सदस्या सौ.आनिता भोसले, सौ. रजनी भोसले यांनी दोघींचेही कौतुक केले आहे.
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक