सांगोला (प्रतिनिधी): महिलांच्या समक्षीकरणासाठी शासनाने स्थापन केलेल्या आदिशक्ती अभियान समितीच्या कोळ्याच्या अध्यक्षपदी समाजसेविका व ग्रामपंचायत सदस्या वंदना संजय सरगर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
राज्यातील महिला व बालकांची मोठ्या प्रमाणात असलेली लोकसंख्या व राज्यातील महिलांच्या जीवनात येणार्या समस्या व त्यांच्या सबलीकरणासंदर्भात भेडसावणार्या समस्या ज्यामध्ये प्रामुख्याने महिलांच्या अर्थिक, सामाजिक, शैक्षणिक व आरोग्य विषयक समस्या जाणून घेऊन त्यांचा सर्वांगिण विकास होण्याच्या दृष्टीने सन 2025-26 पासून राज्यात आदिशक्ती अभियान राबविण्यास मान्यता देण्यात येत आहे. या मोहिमेद्वारे महिलांसाठी राज्यात राबविण्यात येत असलेल्या विविध शासकीय योजना/उपक्रम/कार्यक्रम इ. बाबत आवश्यक व उपयुक्त माध्यमाद्वारे प्रचार प्रसिध्दी देऊन जनमाणसांमध्ये याबाबतची जनजागृती करण्यात येईल. यासाठी ग्रामस्तरीय समित्यांना आदिशक्ती पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे .
ग्राम चळवळीतून महिलांच्या समस्यांचे महत्व जाणून घेणे व महिलांच्या आरोग्य समस्यांचे संवेदनशीलपणे निवारण करणे., कुपोषण, बालमृत्यू, मातामृत्यूचे प्रमाण कमी करण्याकरीता सक्षम समाज निर्माण करणे., लिंगभेदात्मक विचारसरणीला आव्हान देऊन किशोवयीन मुलींमध्ये शिक्षणाचे प्रमाण वाढविणे व बालविवाह मुक्त समाज निर्माण करणे., ही लैंगिक, शारीरिक अत्याचार ला प्रतिबंध करून हिंसाचार मुक्त कुटुंब व समाज निर्माण करणे व अनिष्ट रुर्डीचे निर्मुलन करणे., महिला नेत्तृत्वाला सक्षम करून पंचायत राज पद्धतीमध्ये त्यांचा सहभाग वाढविणे., महिला, किशोरी यांना शिक्षण, रोजगार, निर्णय व हक्क यामध्ये समान संधी निर्माण करून शासकीय योजनांचा लाभ व स्वयंरोजगाराच्या संधींच्याचीयमातून आर्थिक उन्नत श्री संकल्पना राबविणे हे या समितीचे काम आहे.
ग्राम सभेने निवडलेली महिला प्रतिनिधी- अध्यक्ष, पुरुष प्रतिनिधी (महिला व बाल विकास क्षेत्रात सक्रिय)- सदस्य, पुरुष प्रतिनिधी सामाजिक क्षेत्रात सक्रिया- सदस्य, आशा स्वयंसेविका- सदस्य, महिला शिक्षिका / महिला तलाठी/महिला पोलीस पाटील- सदस्य, ग्रामसेवकों ग्राम विकास अधिकारी- सदस्य, पोलीस पाटील-सदस्य, अंगणवाडी सेविका-सदस्य सचिव यांचा या समितीत समावेश आहे.
वंदना सरगर यांचे कोळा गटात महिलांच्या अडीअडचणी सोडवून महिलांचे संघटन करून महिला सक्षमीकरण करण्यासाठी सिंहाचा वाटा आहे. निवडीवेळी ग्रामविकास अधिकारी मोहिते यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. वंदना सरगर यांच्या निवडीने सर्वत्र अभिनंदन होत आहे.
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक