सत्ताधारी आमदारांनी मंत्रालयाच्या जाळीवर मारल्या उड्या

0

धनगर समाजाला आदिवासी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये, यासाठी आदिवासी आमदारांकडून विरोधक केला जात आहे. तसेच गेल्या 15 दिवसांपासून आदिवासी विद्यार्थ्यांकडून पेसाभरती अंतर्गत भरतीच्या आंदोलक करत आहेत. मात्र यावर कुठलाही तोडगा निघत नसल्याचे आज आदिवासी आमदारांनी आक्रमक पाऊल उचलले.

सत्ताधारी पक्षात असलेले आणि विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी सीताराम झिरवळ यांच्यासह दोन आमदारांनी मंत्रालयाच्या संरक्षक जाळीवर उड्या मारल्या. उड्या मारण्यापूर्वी झिरवळ यांच्यासह काही आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. ही भेट निष्फळ ठरल्यानंतर झिरवळ यांच्यासह दोन आमदारांनी जाळीवर उड्या मारल्या. मुख्यमंत्र्यांना आमचे ऐकावे लागेल ते ऐकत नसतील तर आमच्याकडे प्लॅन बी तयार आहे, असे काही तासांपूर्वी नरहरी झिरवळ यांनी म्हटले होते. एसटीच्या आरक्षणास धक्का लागू नये, ही मुळ मागणी आमदारांची आहे. तसेच पेसा कायद्यांतर्गत भरती करण्याची मागणी या आमदारांची आहे. या भयंकर प्रकाराने मंत्रालय हादरले आहे.

गेल्या काही दिवसांपासून आदिवासी समाजासाठी नरहरी झिरवळ आंदोलन करत आहे. त्यांनी आदिवासी समाजाच्या प्रश्नासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दोन वेळा भेट घेतली होती. मुख्यमंत्री आमचे ऐकत नसतील तर आमच्याकडे प्लॅन बी आहे, असे नरहरी झिरवळ यांनी म्हटले होते. त्या प्लॅन बी नुसार नरहरी झिरवळ आणि इतर दोन आमदारांनी संरक्षक जाळीवर उडी मारली. त्यानंतर नरहरी झिरवळ यांची प्रकृती बिघडली. त्यांचा रक्तदाब वाढला आहे. त्यांच्या तपासणीसाठी डॉक्टरांची टीम मंत्रालयात पोहचली आहे. दरम्यान पोलिसांनी या सर्व आमदारांना बाहेर काढले. त्यानंतर त्यांनी मंत्रालयात ठिय्या आंदोलन सुरु केले.

आदिवासी समाजातील आमदार आणि खासदारांनी मंत्रालयात ठिय्या मांडला आहे. त्यात किरण लहामटे, हेमंत सावरा, काशीराम कोतकर यांचा समावेश आहे. आमदार आणि खासदार मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी मंत्रालयात आले होते. परंतु मुख्यमंत्र्यांनी भेट दिली नाही, असे करिण लहामटे यांनी म्हटले.

विद्यार्थ्यांच्या आंदोलनाकडे सरकारने दुर्लक्ष केले. त्यामुळे आम्ही आंदोलन केले. आम्ही सुद्धा माणसे आहोत, असे नरहरी झिरवळ यांनी म्हटले. दरम्यान, सत्ताधारी आमदारांनी केलेल्या या आंदोलनानंतर विरोधी पक्ष आक्रमक झाला आहे. विधानसभेचे विरोध पक्षनेते विजय वड्डेट्टीवर यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here