पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेचा 18 वा हफ्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग

0

शेतकरी गेल्या अनेक दिवसांपासून पीएम शेतकरी सन्मान योजनेच्या 18 हप्त्याची वाट पाहात होते. दरम्यान, आज (5 ऑक्टोबर) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या 18 व्या हप्त्याच्या वितरणास प्रारंभ करण्यात आला. नरेंद्र मोदी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते. वाशिममध्ये असताना त्यांनी या 18 व्या हप्त्याच्या वितरणास प्रारंभ केला.

पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना एक वर्षात एकूण 6000 रुपये दिले जातात. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना आतापर्यंत 17 हप्त्यांमध्ये 34 हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली आहे. शेतकरी या पैशांचा उपयोग पेरणी, कापणी तसेच शेतीच्या अन्य कामांसाठी करतात. आता शेतकऱ्यांना 18 व्या हप्त्याच्या वितरणास सुरुवात झाली आहे. देशभरातील 9.4 कोटी शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार आहे. या योजनेअंतर्गत 18 व्या हप्त्याच्या वितणासाठी केंद्र सरकारने एकूण 20 हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

नमो महासन्मान योजनेचेही 2000 रुपये मिळणार
केंद्र सरकारच्या पीएम शेतकरी सन्मान योजनेच्या धर्तीवर राज्य सरकारकडून नमो शेतकरी महासन्मान योजना राबवली जाते. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वर्षाला 6000 रुपये दिले जातात. म्हणजेच शेतकऱ्यांना वर्षाला 12000 रुपये मिळतात. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नमो शेतकरी महासन्मान योनजेचेही 2000 रुपये महाराष्ट्रातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील जवळपास 91.53 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. नमो शेतकरी महासन्मान योजनेचा हा पाचवा हप्ता आहे.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here