सांगोला (प्रतिनिधी): आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचलित वामनराव शिंदे साहेब आदर्श विद्यालयात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली.
सुरुवातीस प्रशालेत लोकमान्य बाळ गंगाधर टिळक व साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन सचिव नीलकंठ शिंदे सर,मुख्याध्यापक रमेश पवार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी मुख्याध्यापक रमेश पवार सर यांनी लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याविषयी माहिती देऊन विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष कुंभार सर यांनी केले. यावेळी उपस्थित सर्वच विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी थोर महापुरुषांना अभिवादन केले.
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक