कमलापूर येथे आ.डॉ.भाई स्व.गणपतराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त 210 रुग्णांची नेत्र तपासणी

0

ग्रामपंचायत कमलापूर,लायन्स क्लब, सांगोला वतीने नेत्र शिबिर संपन्न

 कमलापूर (प्रतिनिधी): -स्वर्गीय आमदार डॉ.गणपतराव देशमुख यांच्या 98 व्या जयंतीच्या निमित्ताने ग्रामपंचायत कमलापूर व लायन्स क्लब, सांगोला, श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन लायन्स आय हॉस्पिटल सांगली, यांच्या संयुक्त विद्यमाने कमलापूर येथे भव्य नेत्र तपासणी शिबिर व रक्तदान शिबिर पार पडले. या शिबिरामध्ये 210 रुग्णांची तपासणी करून 14 रुग्ण सांगली लायन्स हॉस्पिटल येथे ऑपरेशन साठी रवाना झाले.

सुरुवातीला स्वर्गीय गणपतराव देशमुख यांच्या प्रतिमेस लोकप्रिय आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्या शुभहस्ते पुष्पहार समर्पित केला.आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी आपल्या मनोगतामध्ये लायन्स क्लबच्या कार्याचा गौरव करत.स्वर्गीय आबासाहेबांनी सांगोला तालुक्यातील गोरगरीब,कष्टकरी जनतेला नेहमीच आधार आणि न्याय देण्याचे काम केले. त्यांच्या जयंतीचे निमित्त साधून समाजातील गरजू लोकांसाठी विधायक काम करणे ही आपली जबाबदारी आहे. असे आमदार देशमुख यांनी सांगितले.

यावेळी उपस्थित माजी जिल्हा परिषद सदस्य संगम (आप्पा) धांडोरे, युवा नेते शशिकांत येलपले,विष्णू देशमुख,अमोल खरात,ला.गिरीश नष्टे, ला. अँड संजीव शिंदे,उद्योगपती महादेव वाघमारे,युवा नेते बाबुराव बंडगर, माजी उपसरपंच देविदास ढोले, युवा नेते रावसाहेब अनुसे,रमेश वाघमारे,डॉ.सतीश तंडे, सरपंच रुपली सत्यवान तंडे, लायन्स क्लबचे माजी प्रांतपाल प्रा.प्रबुद्धचंद्र झपके सर यांच्या मार्गदर्शनाखाली लायन्स क्लबचे सांगोला अध्यक्ष प्रा.एन.डी बंडगर,सचिव सूर्यकांत कांबळे,खजिनदार मंगेश म्हमाणे, डॉ. रियाज मुल्ला,तंटामुक्तीचे उपाध्यक्ष सोमनाथ अनुसे, सखाराम आदलिंगे,सुरेश केसकर, चेअरमन दिलीप बंडगर, उपसरपंच नितीन काळे, साधू गोडसे, नवनाथ पडवळे,अनिल पडवळे, ग्रामसेवक संजय खटकाळे,विजय देवकते,धर्मराज टकले,गोरख पुजारी,प्रकाश ऐवळे, इंजि.सागर अनुसे,बाळासो पांढरे,समाधान बंडगर, कुमार जाधव,संतोष शिंदे, संतोष टाकळे,अर्जुन पुजारी,ओंकार नवले,रोहित कोळेकर, सुशांत नवले,बाळकृष्ण बंडगर,सत्यवान बंडगर,लालू कांबळे,पोलीस-पाटील विजय म्हत्रे, भगवान अनुसे, भागवत अनुसे, शामराव बंडगर,दामोदर बंडगर, ईश्वर ऐवळे, दगडू ऐवळे, बाळू तोरणे,दत्तात्रय नवले,आबासो चंदनशिवे, अतुल कांबळे,रघुनाथ ऐवळे, अशोक ऐवळे, अनिल चंदनशिवे,कमलापूर ग्रामपंचायतचे सर्व सेवक,आरोग्य सेविका,इत्यादी पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्र संचालन लायन्स क्लबचे अध्यक्ष प्रा.एन.डी.बंडगर तर आभार प्रदर्शन सोमनाथ (अण्णा) अनुसे यांनी मानले.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here