स्व.आ.डॉ. भाई गणपतरावजी देशमुख यांच्या जयंती निमित्त भव्य रंगभरण, कथाकथन व रेकॉर्डेड लोकनृत्य स्पर्धा संपन्न

0

 

सांगोला / प्रतिनिधी- 12 ऑगस्ट रोजी स्व.आ.डॉ. भाई गणपतरावजी देशमुख यांच्या जयंती निमित्त भव्य रंगभरण, कथाकथन व रेकॉर्डेड लोकनृत्य स्पर्धा डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालय सांगोला व न्यू इंग्लिश स्कूल सांगोलाच्या कॅम्पस मध्ये संपन्न झाल्या.

रंगभरण स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक कुमार तन्मय अनिल वाघमोडे, कुमारी श्रद्धा महेश खडतरे, कुमारी माहेश्वरी हनुमंत जाधव, कुमार निखिल मारुती अंकुशी, कुमारी अनुष्का भारत माने, कुमारी नम्रता नागनाथ बनसोडे, कुमार कृष्णा निमिकेश तेली, कुमारी कृष्णाली सुरज चोथे, कुमारी रुसैय्या हुसेन सुतार, कुमारी पूर्वा विनायक मस्के यांनी नंबर पटकावले आहेत.

कथाकथन स्पर्धेमध्ये 5 वी ते 7 वी गट- प्रथम कुमारी महादेवी दत्तात्रय जावीर, द्वितीय कुमारी राधिका पंकज किर्तके, तृतीया कुमारी श्रद्धा कांतीलाल राऊत व उत्तेजनार्थ कुमारी समृद्धी बापू ऐवळे यांनी नंबर पटकावले आहेत. इयत्ता 8 वी ते 10 वी गट – प्रथम कुमारी समृद्धी विष्णू माळी, द्वितीय कुमार प्रसाद हरिदास शिनगारे, तृतीया कुमारी प्रांजली महादेव ढगे, उत्तेजनार्थ कुमारी श्रावणी विष्णू माळी यांनी नंबर पटकावले आहेत. ज्युनिअर गट – प्रथम कुमारी वैष्णवी शांताराम यमगर, द्वितीय कुमारी साक्षी सुभाष पवार, तृतीय कुमारी अंतरा दिलीप निकम व उत्तेजनार्थ कुमारी रोहिणी राजेंद्र होवाळ यांनी नंबर पटकावले आहेत. सीनियर गट – प्रथम कुमारी प्रज्ञा किशोर मिसाळ, द्वितीय कुमारी रुक्मिणी संजय हातेकर, तृतीय कुमार प्रशांत राजेंद्र चांडोले, उत्तेजनार्थ कुमारी मयुरी संतोष पवार यांनी नंबर पटकावले आहेत.

रेकॉर्डेड लोकनृत्य स्पर्धा जि.प. प्रा. शाळा गट – पहिली ते चौथी गट

प्रथम क्रमांक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोडसेवाडी, द्वितीय जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पुजारवाडी, तृतीय जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाटीलवस्ती यांनी नंबर पटकावले आहेत. खाजगी शाळा गट – प्रथम क्रमांक सांगोला विद्यामंदिर प्राथमिक विद्यालय सांगोला, द्वितीय उत्कर्ष प्राथमिक विद्यालय सांगोला, तृतीया न्यू इंग्लिश स्कूल प्राथमिक विद्यालय सांगोला यांनी नंबर पटकावले आहेत. 5 वी ते 7 वी गट प्रथम न्यू इंग्लिश स्कूल सांगोला, द्वितीय महात्मा फुले विद्यालय डोंगरगाव, तृतीय जुनोनी विद्यालय जुनोनी यांनी नंबर पटकावले आहेत. 8 वी ते 10 वी गट – प्रथम न्यू इंग्लिश स्कूल सांगोला, द्वितीय शिवणे माध्यमिक विद्यालय शिवणे, तृतीय लक्ष्मीदेवी विद्यामंदिर हायस्कूल सोनंद यांनी नंबर पटकावले आहेत.

सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सिकंदर मुलाणी, न्यू इंग्लिश स्कूल व ज्यू. कॉलेजचे प्राचार्य प्रा. केशव माने सर व न्यू इंग्लिश स्कूल पूर्व प्राथमिक व प्राथमिकचे प्राचार्य श्री. दिनेश शिंदे सर, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.अशोक कांबळे, सौ.इंदिरा येडगे मॅडम, सौ.स्मिता इंगोले मॅडम, उपप्राचार्य प्रा.संतोष जाधव सर यांनी व त्यांचे सर्व सहकारी प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक व विद्यार्थी यांनी विशेष परिश्रम घेतले आहे. अशी माहिती प्रसिद्धी कमिटीचे चेअरमन प्रा. बाळासाहेब सरगर यांनी दिली आहे.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here