विधवा महिलांच्या हस्ते नराळे गावात ध्वजारोहण

0

नराळे (प्रतिनिधी):  सांगोला तालुक्यातील नराळे ग्रामपंचायतीत स्वातंत्र्य दिनाचा ध्वजारोहणाचा मान गावातील विधवा महिलांना देण्यात आला. प्रियंका शहाजी भोसले आणि उज्वला संजय यादव यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले. देशभक्तीपर गीतांनी वातावरणात चैतन्य पसरले होते.

या कार्यक्रमाला महिला सरपंच वैशाली भोसले, जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक लक्ष्मण भोसले,मुख्याध्यापक, शिक्षकवर्ग, गाव कामगार पोलीस पाटील नरेंद्र गायकवाड आणि शेतकरी संस्थेचे चेअरमन ज्ञानेश्वर भोसले तंटामुक्ती अध्यक्ष रामभाऊ वाघमोडे, गावातील प्रतिष्ठित नागरिक तसेच शाळेच्या विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ध्वजारोहननंतर मेजर समाधान यशवंत यादव यांचा ग्रामपंचायतीतर्फे विशेष सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना सरपंच वैशाली भोसले म्हणाल्या, गावातील विधवा महिलांसाठी श्रमशक्ती योजनेद्वारे रोजगार उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामुळे महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्याची संधी मिळणार आहे.तसेच ग्रामपंचायतकडून व लोकसहभागातून विधवा महिलांचा विमा उतरवला जाणार असे जाहीर केले.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here