अजनाळे (प्रतिनिधी): राज्यस्तरीय ए.टी.एस. प्रज्ञाशोध परीक्षा 2024-25 चा पारितोषिक वितरण सोहळा शनिवार, दि. 16 ऑगस्ट 2025 रोजी सांगोला येथील सदानंद मल्टीपर्पज हॉल येथे उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्यात अभिनव पब्लिक स्कूल, अजनाळे येथील दोन विद्यार्थिनींनी उल्लेखनीय यश संपादन करत स्कूलची मान अभिमानाने उंचावली.
कु. हर्षिता संदीप कोळवले (इयत्ता 2री) हिने या परीक्षेत 200 पैकी 156 गुण मिळवत केंद्रात 3रा, जिल्ह्यात 14वा व राज्यात 21वा क्रमांक पटकावला तसेच कु. सलोनी बापुराव कोळवले (इयत्ता 5वी) हिने 300 पैकी 256 गुण मिळवत केंद्रात 1ली, जिल्ह्यात 10वी व राज्यात 17 वी येण्याचा मान पटकावला. या घवघवीत यशाबद्दल दोन्ही विद्यार्थिनींना पारितोषिक प्रदान करून गौरविण्यात आले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. रणजितसिंह देशमुख (प्राचार्य, शिवाजी पॉलिटेक्निक ), भाई गणपतराव देशमुख शे. सह. सुत सांगोला चेअरमन डॉ. प्रभाकर माळी , श्री. सिद्धेश्वर झाडबुके श्री. विजय म्हेत्रे (रोटरी क्लब), श्री. रविकांत मराळ , श्री. बापूसो भंडगे (निवोदिक साहित्यिक). मा. वंदना पाटणे (लेखिका), समाधान केदार आदी मान्यवर उपस्थित होते.
विद्यार्थिनींच्या या उल्लेखनीय यशाबद्दल अभिनव पब्लिक स्कूल चे संस्थाध्यक्ष मा. शिवाजी लाडे सर, मुख्याध्यापिका कावेरी गिड्डे मॅडम, शिक्षकवृंद व पालक वर्ग यांनी अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक