सोनंद (प्रतिनिधी ): ७९ व्या भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित्त संस्थेचे अध्यक्ष आदरणीय ज्ञानेश्वर जी कोळसे पाटील यांच्या हस्ते शाळेत ध्वजारोहण करण्यात आले यावेळी बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते
स्वातंत्र्य दिना निमित्त घर तिरंगा, तिरंगा थीम रांगोळी स्पर्धा ,समूहगीत स्पर्धा, भाषण स्पर्धा, चित्रकला या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.
विद्यार्थ्यांनी चित्रकला स्पर्धेमध्ये काढलेल्या चित्रांमधून सेल्फी पॉईंट निर्मिती केली होती .यावर्षी विशेष आकर्षण म्हणजे संगीतावर कवायतीचे नियोजन व जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा संचलनामध्ये सहभाग अशा भरघोस कार्यक्रमासह सावित्रीबाई फुले प्रशाला सोनंद येथे स्वातंत्र्य दिन मोठा दिमाखात साजरा झाला
याबरोबरच मुलांच्या ज्ञानात भर पडावी म्हणून राष्ट्रध्वजाबाबत मुलांच्या मध्ये माहिती जागृती व्हावी म्हणून खास प्रश्नमंजुषा चे आयोजन करण्यात आलेले होते. यामध्ये पन्नास प्रश्नांच्या माध्यमातून मुलांना राष्ट्रध्वजा विषयी माहिती देण्यात आली. शिक्षिका कुमारी इनामदार यांच्या कल्पनेतून प्रश्नमंजुषा कार्यक्रम पार पडला कुमारी श्रुतिका काशीद व श्री तांबोळी सर यांनी गुणलेखन केले. आजच्या वाचन संस्कृती लोप पावत चाललेल्या काळामध्ये काहीतरी नवीन क्लिप त्या तंत्रे वापरून मुलांना माहिती देणे क्रमप्राप्त आहे त्यामुळे प्रश्नमंजुष्याचे आयोजन केले होते .
तिरंगा थीमवर लहान व मोठ्या गटात विद्यार्थिनींनी रांगोळ्या रेखाटल्या मोठ्या गटात प्रथम क्रमांक कुमारी रुपनर ,नलवडे ,बाबर व काशीद यांच्या ग्रुपला मिळाला. भारतीय सीमेवर लढणाऱ्या जवानांना समर्पित ही रांगोळी साकारली होती. द्वितीय क्रमांक कुमारी वैष्णवी काशीद व ग्रुपला मिळाला तसेच लहान गटांमध्ये प्रथम क्रमांक कुमारी स्वप्नाली बुरंगे हिला तर द्वितीय क्रमांक कुमारी आराध्या काशीद हिने पटकावला आज-काल पाठांतरापासून मुले दुरावत आहेत गायन कलेकडे ही विद्यार्थ्यांची अनास्था आहे. यावर उपाय म्हणून प्रशालेमध्ये भाषांतर ऐवजी देशभक्तीपर चारोळ्या विद्यार्थ्यांकडून सादर करून घेतल्या.
गतवर्षीपेक्षा जास्त मुलांना संचलन करण्याची संधी मिळावी म्हणून तीन ग्रुपने राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे ही यावेळी नियोजन करण्यात आलेले होते. ग्रामसचिवालयाकडून व संस्थेकडूनही मुलांना खाऊ वाटप झाले व सालाबाद प्रमाणे इयत्ता दहावी बारावीतील विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित केलेला होता. मुख्याध्यापिका श्रीमती शेडसाळे व सर्व प्रशालेतील शिक्षकांनी कार्यक्रमास परिश्रम घेतले.
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक