✒️ आभाळ फाटलं !
▪️राज्यात पावसाचे धुमशान! पाच दिवसांत २१ जणांचा मृत्यू
▪️मध्य, हार्बर रेल्वे ठप्प, हवाई वाहतुकीलाही फटका; रस्ते वाहतुकीचा बोजवारा
▪️कोकण, विदर्भ, मराठवाड्यात पूरस्थिती
▪️ग्रामीण भागात पिकांचे प्रचंड नुकसान, जनावरे दगावली
▪️मुंबईत ३०० मिमी, तर ठाण्यात रेकॉर्डब्रेक २२५ मिमी पाऊस
▪️एनडीआरएफ, एसडीआरएफ अलर्ट मोडवर
▪️१४ लाख हेक्टर क्षेत्र बाधित; सरकारचे पंचनाम्याचे आदेश
▪️मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, पुण्याला आज ‘रेड अलर्ट’
▪️सिंधुदुर्ग, नागपूर, गडचिरोली, गोंदियात ‘ऑरेंज अलर्ट’चा इशारा
✒️ मुंबईसाठी नवीन २६८ एसी रेल्वे गाड्यांची खरेदी
▪️पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांमुळे महाराष्ट्राच्या विकासाला गती – मुख्यमंत्री
✒️ ‘इंडिया’चा उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार अखेर ठरला
▪️सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांच्या नावाची घोषणा
✒️ महाराष्ट्रात ४२ हजार कोटींची गुंतवणूक
▪️मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत १० सामंजस्य करार
✒️ ठाकरे गटावर अन्याय होत असल्याची जनभावना
▪️निकालाला विलंब
✒️ आगामी निवडणुकीत व्हीव्हीपॅट मशीन वापरा
▪️काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी
✒️ गाळ उपसा करण्याच्या नावाखाली घोटाळे
▪️मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
✒️ गिल थेट उपकर्णधार, श्रेयस पुन्हा संघाबाहेर !
▪️आशिया चषक टी-२० स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर; बुमराचे अपेक्षित पुनरागमन, यशस्वीला राखीव खेळाडूंत स्थान
✒️ रेणुकाचे पुनरागमन, शफालीला मात्र डच्चूच
▪️एकदिवसीय विश्वचषकासह ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी महिला संघाची घोषणा
✒️ मनूचा एकाच दिवशी दुहेरी कांस्यवेध
▪️आशियाई नेमबाजी स्पर्धा
✒️ पंढरपूर तालुक्यातील गार्डी ते मोरेवस्ती रस्त्यावरील पुलाच्या बांधकामास नाम. जयकुमार गोरे यांची मंजुरी
▪️५ कोटी ७० लाखाच्या निधीची तरतूद
▪️माजी आमदार अॅड. शहाजीबापू पाटील यांच्या प्रयत्नाला यश
✒️ सांगोलाः सगळीकडेच फार्मर आयडी मिळता मिळेना !
▪️पीक विमा काढण्यासाठी शेतकऱ्यांसमोर अडचणी वाढल्या
✒️ अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळ ठाणे यांचा राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले समाज भूषण पुरस्कार प्रा. राजेंद्र ठोंबरे याना जाहीर
✒️ मुख्याधिकारी साहेब आले आणि ठेकेदार कामाला लागले
▪️व्यापार संकुलाच्या बांधकामासाठी सुरू असलेल्या खोदकामामुळे नजीकच्या राहत्या घरांचे नुकसान होणार नाही याबाबत खबरदारी घ्यावी; मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी
▪️महिलांच्या मागणीला यश: मंगळवारी दुपारपासूनच ठेकेदारांकडून कामाला सुरुवात
✒️ प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना पाणलोट समिती घटक २.० अंतर्गत उत्पादन पद्धतीच्या वैयक्तिक लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा
✒️ जलजीवन योजनेचे ५० टक्के काम अपूर्ण तरीही १२७.५२ लक्ष रुपये रक्कम ठेकेदारास अदा केली; बाळासाहेब गडहिरे
▪️वाणीचिंचाळे गावातील जल जीवन मिशन योजनेचे अपूर्ण काम पूर्ण करण्यात यावे या मागणीसाठी बहुजन समाज पार्टीच तहसील कार्यालय समोर धरणे आंदोलन
✒️ ९० जनावरांना लंपी रोगाची लागण
▪️आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी ७० हजार जनावरांना लस टोचणी ; ४० हजार डोस मागविले: डॉ. असलम सय्यद
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक