सांगोला (प्रतिनिधी)- देश विदेशात बॉडी बिल्डर म्हणून नावलौकिक मिळवलेल्या व नुकताच “डॉ. बाबासाहेब आंबेडकर राज्य क्रीडा रत्न पुरस्कार जाहीर झालेल्या संकेत संजय काळे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त मंगळवारी आपुलकी प्रतिष्ठानला ५०००/- रुपये देणगी देऊन आपुलकीच्या सामाजिक कार्याला हातभार लावला आहे.
राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्ताने, संजीवनी एज्युकेशनल, कल्चरल अँड स्पोर्ट्स रिसर्च फाउंडेशन, पुणे, महाराष्ट्र यांच्या वतीने देण्यात येणारा “डॉ. बाबासाहेब आंबेडकर राज्य क्रीडा रत्न पुरस्कार – २०२५” संकेत संजय काळे यांना नुकताच जाहीर झाला आहे. त्याबद्दल व प्रतिष्ठानला देणगी दिल्याबद्दल संकेत काळे यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करून शुभेच्छा देऊन आभार मानले. आपुलकी प्रतिष्ठान कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला अध्यक्ष राजेंद्र यादव, सचिव संतोष महिमकर, संजय काळे सर, रमेश जाधव, अरविंद केदार, महादेव दिवटे, सुरेशकाका चौगुले, कैलास कांबळे, अरविंद डोंबे, सुशील माने, अनिल देशपांडे आदी उपस्थित होते.
जमा होत असलेल्या देणग्या व सदस्यांच्या मासिक देणगीतून शहर व तालुक्यातील गरजूना विविध प्रकारची मदत केली जात असून गरजू रुग्णांना ऑक्सिजनची घरीच सोय व्हावी यासाठी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन त्याचबरोबर हॉस्पिटल बेडची सुविधा नाममात्र शुल्क घेऊन उपलब्ध करण्यात आली आहे. याचा लाभ गरजू रुग्णांनी व त्यांच्यानातेवाईकांनी मो. क्र. ९०११७०७०८० वर संपर्क साधून घ्यावा – राजेंद्र यादव (अध्यक्ष)
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक