श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालयात ‘श्रीमती विजयादेवी देशमुख शारदीय व्याख्यानमाला’ चे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून माननीय डॉ. विद्या विजय नावडकर (छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा) उपस्थित होत्या. त्यांनी ‘समकालीन कालखंडातील स्त्रिया समोरील आव्हाने’ या विषयावर आपले विचार मांडले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. शिवाजीराव भोसले होते.
डॉ. नावडकर यांनी आपल्या व्याख्यानात २१ व्या शतकातील कौटुंबिक आव्हाने, स्त्रीचा संघर्ष, काम आणि कौटुंबिक जबाबदारी, तसेच लैंगिक अत्याचार यावर विचारमंथन केले. त्यांनी भयमुक्त, निर्भय आणि निर्मळ समाजाची उभारणी करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साक्षी बनसोडे यांनी केले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व विद्यार्थिनी, प्राध्यापिका आणि प्रशासकीय सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक