तालुक्यातील शेकडो विद्यार्थी होणार सन्मानित. महर्षी वाल्मिकी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी संचलित ‘ए.टी.एस’ या राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षेचा बक्षीस वितरण समारंभ रविवार दिनांक १३/१०/२०२४ रोजी सकाळी ११ वा. मातोश्री मल्टीपर्पज हॉल वासूद रोड सांगोला येथे पार पडणार असल्याची माहिती सांगोला तालुका स्पर्धा परीक्षा समन्वयक मा. समाधान केदार यांनी दिली आहे.
हा बक्षीस वितरण समारंभ सांगोला पोलिस ठाण्याच्या पोलिस उपनिरीक्षक मा. स्नेहल चव्हाण, सांगोला वनक्षेत्र अधिकारी मा. वनिता इंगोले, मुंबई पोलीस मा. मच्छिंद्र माळी, सांगोला पंचायत समिती शिक्षण विस्तार अधिकारी मा. अमोल भंडारी साहेब, एल.के.पी मल्टीस्टेटचे चेअरमन मा. अनिलभाऊ इंगवले, जवाहर विद्यालय घेरडीचे मुख्याध्यापक मा. धनंजय डोंगरे, सानेगुरुजी कथामालेचे सल्लागार मा. सिद्धेश्वर झाडबुके, माध्यमिक शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन मा. निवास येलपले, ए.टी.एस स्पर्धा परीक्षेचे मुख्य प्रवर्तक मा. विनोद कोळी, बालसाहित्यिक मा. फारुख काझी, नवोदित साहित्यिक मा. बापुसो भंडगे व स्पर्धा परीक्षा तालुका समन्वयक मा. समाधान केदार या मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
तरी या तालुकास्तरीय बक्षीस वितरण समारंभासाठी पारितोषिक पात्र विद्यार्थी, पालक व मार्गदर्शक शिक्षक बांधवानी वेळेवर उपस्थित रहावे असे आवाहन मंथन बुक स्टॉलच्या संचालिका मा. प्रियांका केदार यांनी केले आहे.बक्षीस पात्र विद्यार्थ्यांच्या याद्या संबंधित शैक्षणिक ग्रुपवर प्रकाशित करण्यात आलेल्या आहेत.
तसेच या सन्मान सोहळ्यात ज्या शाळांनी ”मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा” टप्पा क्रमांक- २ मध्ये जिल्हा व तालुका स्तरावर घवघवीत यश संपादन करून आपल्या शाळेचे, गावाचे व तालुक्याचे नाव उज्ज्वल केल्याबद्दल जि.प. प्रा. शाळा शेळकेवाडी(वाकी शिवणे) जिल्हा प्रथम क्रमांक, जि. प. प्रा. शाळा घेरडी तालुका प्रथम क्रमांक, जि.प.प्रा. शाळा बाबर सपताळवाडी (वासूद) तालुका द्वितीय क्रमांक, तर जि.प.प्रा. शाळा बनकरमळा तालुका तृतीय क्रमांक तर सर्वसाधारण गटातील सिंहगड पब्लिक स्कूल कमलापूर प्रथम क्रमांक, महात्मा फुले विद्यालय डोंगरगाव द्वितीय क्रमांक व सांगोला विद्यामंदिर प्रशाला तृतीय क्रमांक या शाळांचा मंथन बुक स्टॉल सांगोला यांच्या वतीने विशेष सन्मान करण्यात येणार आहे.
अधिक माहितीसाठी तालुका स्पर्धा परीक्षा समन्वयक समाधान केदार यांच्याशी संपर्क साधावा.
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक