आंबा या फळफिकानंतर बाजारात सफरचंद, पेरू यासह नुकत्याच झालेल्या शारदीय नवरात्र उत्सवामुळे केळी या फळांनी मार्केट गाजवले आहे. यामध्येच डाळिंबाची आवक वाढल्यानंतर दर कमी येणार असले, तरी सध्या तरी लाल भडक अन् भाव कडक अशी डाळिंबाची अवस्था आहे.
सांगोला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या डाळींब सौदे मार्केटमध्ये शनिवार दि-१२ ऑक्टोबर रोजी महालक्ष्मी फुट कंपनी. या आडत दुकानामध्ये अमोल मोहन येलपले या शेतक-याच्या भगवा जातीच्या डाळींबाला प्रति किलो-७०१/- या दराने श्री खंडू (नाना) जाधव या व्यापा-याने सर्वाधिक लिलावा बोली बोलून खरेदी केले. शेतकरी व व्यापारी या दोघांचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती समाधान पाटील व संचालक रामचंद्र बाबर यांनी सत्कार केला आहे. डाळींब मार्के टमध्ये दररोज ४००० ते ५००० क्रेटची आवक होत असून दररोज ३५ ते ४० लाखाची उलाढाल होत आहे. तरि सर्व शेतकरी बांधवांनी आपले डाळींब सांगोला मार्केट मध्ये आणावे. असे आव्हान सभापती समाधान पाटील यांनी केले आहे.
तेल्या, पिनहोल बोरर, मररोगामुळे डाळिंब फळबागांच्या क्षेत्रात मोठी घट झाली आहे. त्याचा परिणाम म्हणून डाळिंबाची आवक मोठ्या प्रमाणात घटल्याने डाळिंबाच्या दराने उच्चांक गाठला आहे. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही डाळिंबाला अच्छे दिन आले असून, शेतकऱ्यांच्या चांगल्या मालाला ७०० रुपयांवर दर मिळत असल्याने शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण आहे. डाळिंबाला अच्छे दिन दिसत असल्याने नवीन शेतकरीही फळबागांकडे वळल्याने डाळिंब लागवडीचे क्षेत्र वाढत आहे.
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक