प्रतिनिधी (शशिकांत कोळी):लक्ष्मीदेवी विद्यामंदिर सोनंद प्रशालेमध्ये दि.15 ऑक्टोबर अर्थात भारताचे माजी राष्र्टपती भारतरत्न डाॅ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन करून वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला .जागतिक हात धुणे विषयी मुलांना माहिती देऊन आरोग्याचे महत्व पटवून दिले
यासाठी प्रशालेमध्ये सांगोल्यातील प्रसिद्ध डॉ.स्मिता गव्हाणे मॅडम यांचे व्याख्यान आयोजित केले होते .डॉ.स्मिता गव्हाणे मॅडम यांनी मुलांना प्रोजेक्टर वरती वेगवेगळे व्हिडिओज दाखवून गुड टच -बॅड टच समजावून सांगितले .बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनातील शंकेचे निरसन डाॅ.गव्हाणे मॅडम यांनी वेगवेगळी उदाहरणे देऊन केले .
याप्रसंगी संस्थासदस्या सौ.रजनीताई भोसले , प्राचार्य हेमंत आदलिंगे, मुख्याध्यापिका सौ. पुष्पाताई महांकाळ, पर्यवेक्षक प्रा.सुभाष आसबे,पर्यवेक्षिका सौ.सुषमा ढेबे, सौ.कुंभार मॅडम, सौ. बाबर मॅडम, सौ.साळुंखे मॅडम, श्री.शेजाळ सर तसेच विद्यार्थी, विद्यार्थीनी यांची उपस्थिती होती.
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक