शहाजीबापू निवडणूक लढणार नाहीत : उत्तमराव जानकर

0

 

बाबासाहेब विरुद्ध दिपकआबा अशीच होणार लढत

        सांगोल्यातून विद्यमान आमदार शहाजी बापू पाटील निवडणूक लढवणार नाहीत. सांगोल्यात दीपक आबा साळुंखे विरुद्ध डॉक्टर बाबासाहेब देशमुख अशी निवडणूक होईल,असा दावा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते उत्तम जानकर यांनी केला आहे. ते कोळा येथील सभेत बोलत होते. सांगोला तालुक्यातील कोळा येथे आज आयोजित सत्कार समारंभात उत्तम जानकर बोलत होते. यावेळी माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील, काँग्रेसचे माजी आमदार रामहरी रुपनवर , सांगोल्याचे इच्छुक उमेदवार डॉक्टर बाबासाहेब देशमुख आणि मोठ्या संख्येने शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

शहाजीबापूंनी आजवर जेवढ्या निवडणुका लढवल्या त्या प्रत्येक वेळी त्यांच्या खिशात एकही रुपया नसायचा. अगदी गेल्यावेळी मी तिथे गेल्यावर मला जेवण घालायलाही त्यांच्याकडे खिशात पैसे नव्हते. बापू नेहमी दुसऱ्याच्या पैशावर रिस्क घेतात. आता मात्र बापू शिलकीमध्ये आहेत , असा टोलाही जानकर यांनी लगावला.

पुढे बोलताना जानकर म्हणाले, बापूला हे नक्की माहिती आहे की यंदा निवडणूक दुरंगी झाली तर काय होणार? आता तर दीपक साळुंखे यांच्या रूपाने तिसरा उमेदवार आलाय. त्यांना सांगोला आणि मतदारसंघातून मोठा प्रतिसाद मिळू लागला आहे. त्यामुळे यंदाची निवडणूक ही दीपक आबा विरुद्ध बाबासाहेब देशमुख अशीच होणार याची मला खात्री आहे. शहाजी बापू रिंगणातून माघार घेतील असा दावा उत्तम जानकर यांनी केला आहे.

सध्या महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या मागे जनतेची जोरदार उसळी आहे. महाराष्ट्राचे चित्र काय असणार हे सगळ्यांना समजत आहे. त्यामुळे यावेळी सांगोल्यात बापू विरुद्ध आबा अशीच लढत पाहायला मिळेल, असंही जानकर म्हणाले.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here