सांगोला (प्रतिनिधी): सांगोला नगरपरिषदेच्या वतीने पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर सभागृह येथे नवनिर्वाचित लोकनियुक्त नगराध्यक्ष श्री. आनंदा माने व नवनिर्वाचित सदस्य यांचा स्वागत समारंभ मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी यांच्या हस्ते पार पडला. यावेळी सर्व सदस्यांचा शाल व रोपटे देऊन स्वागत करण्यात आले.

तसेच सर्व विभागप्रमुख यांनी आपल्या विभागाची माहिती दिली. सांगोला शहराला विकासाची नवी उंची गाठण्यासाठी प्रशासन व सदस्यांनी एकत्र काम करावे तसेच सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी नागरिकांची कामे जलद गतीने निकाली काढावीत अशा सूचना लोकनियुक्त नगराध्यक्ष श्री.आनंदा माने यांनी केल्या. नगरसेविका सौ. राणी माने, नगरसेवक श्री. रमेश जाधव व नगरसेवक श्री. ज्ञानेश्वर तेली यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी नगरपरिषदेचे सर्व अधिकारीकर्मचारी, शहरातील नागरिक उपस्थित होते.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



