जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा कमलापूर येथे आरोग्य शिबीर संपन्न 

0

कमलापूर (प्रतिनिधी): मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान कमलापूर व जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा कमलापूर संयुक्त विद्यमाने  मंगळवार दि. 30 डिसेंबर रोजी पंढरपूर येथील प्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ नीरज शहा व डॉ शिनगारे यांचे बाल रोग निदान शिबिर आयोजित करण्यात आले. सदर शिबिरात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले करण्यात आले.

शिबिरासाठी माणदेश भूषण डॉ शिवाजीराव ढोबळे बलवडी तालुका वैद्यकीय अधिकारी श्री डॉ संदिप देवकते डॉ गाढवे गटविकास अधिकारी श्री उमेशचंद्र कुलकर्णी साहेब सहाय्यक गटविकास अधिकारी वसंत फुले साहेब युवा उद्योजक बाबुराव बंडगर कमलापूर सरपंच डॉ सत्यवान तंडे माजी सरपंच रावसाहेब अनुसे मधुकर तंडे माजीउपसरपंच देविदास ढोले नितीन काळे दिलीप बंडगर कमलापूर केंद्राचे केंद्रप्रमुख श्री आप्पासाहेब पवार केंद्रीय मुख्याध्यापक बशीर मुलाणी सुरेश ढोले गुरुजी सिंहगड कॅम्पस डायरेक्टर अशोक नवले सर ग्रामविकास अधिकारी संजय खटकाळे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र कमलापूर गंगणे मॅडम कोळी सर आशा वर्कर्स त्यांचा सर्व स्टाफ कमलापूर ग्रामपंचायत सर्व कर्मचारी स्टाफ जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा कमलापूरचे सर्व शिक्षक स्टाफ उपस्थित होते सदर शिबिरामध्ये केंद्र शाळा कमलापूर अंगणवाडी कमलापूर व परीट कोळेकर वस्ती मधील सर्व विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली. मान्यवरांच्या उपस्थितीत शाळेच्या प्रांगणामध्ये वृक्षारोपण करण्यात आले.

हल्ली कॅन्सरचे वाढते प्रमाण एक चिंताजनक बाब बनलेली आहे त्यामुळे दहा वर्षाच्या पुढील मुलांनी अँटीकल्सर प्रतिबंधक लस जरूर टोचून घ्यावी याची आवश्यकता डॉक्टर नीरज शहा यांनी प्रतिपादन केले. तसेच सध्याच्या धावपळीच्या युगामध्ये विद्यार्थ्यांच्या आरोग्याकडे पालकांनी जरूर लक्ष द्यावे याविषयी त्यांनी सखोल मार्गदर्शन केले

– डॉ नीरज शहा प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ पंढरपूर

 

सदर आरोग्य शिबिरामध्ये बोलताना तालुक्याचे गटविकास अधिकारी माननीय उमेश चंद्र कुलकर्णी यांनी मुले शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त असतील तर ती मानसिक दृष्ट्या तंदुरुस्त राहत राहतात व त्यांच्या गुणवत्तेत वाढ होऊन भविष्यकाळातील स्पर्धेमध्ये ती टिकून राहतात म्हणून मुलांच्या आरोग्याकडील लक्ष देण्याची आवश्यकता डॉक्टर आवश्यकता आहे

– गटविकास अधिकारी श्री उमेशचंद्र कुलकर्णी.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here