गौडवाडी प्रतिनिधी (शशी हातेकर) : – दि.30/12/2025 रोजी जि. प. प्रा. शाळा गौडवाडी केंद्र कोळे येथे बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले उद्घाटनास शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी शाळेचे मुखयाध्यापक सर्व शिक्षकवृंद तंटामुक्तीचे अध्यक्ष महादेव आलदर यांच्या असते श्रीफल वाढवून व फित कापून करणेत आले श्री तानाजी चंदनशिवे सर बजरंग आलदर सर तुकाराम बुरुंगले सोमनाथ शिंगाडे(शा. व्य.स.उपाध्यक्ष) दत्ता गुळीग वि. से.सो सदस्य इतर पालक मान्यवर उपस्थित होते श्री दिगंबर पांढरे सरांनी मान्यवरांचे स्वागत केले . प्रस्तावनेत बाल आनंद खरेदी विक्री बाजारातील नफा तोटा मार्केटिंग तंत्रज्ञान यासंबधी माहिती सांगितली. प्रत्यक्ष अनुभव येण्यासाठी येण्यासाठी हा बाल आनंद घेण्यात आला असेलस सांगितले.

मेळाव्यात तिसरी ते सातवीच्या मुलांचे पंचेचाळीस स्टॉल लावण्यात आले यामध्ये भाजीपाला कांदा बटाटा कोबी फ्लॉवर वटाना टमाटा गवार घेवडा कोथिंबीर मेथी करडई तसेच अंडीबिर्याणी पाणीपुरी, ओलिभेल सुखी भेळ चहा वडापाव, इडली डोसा, समोसा, कोबी मंचुरियन शेंगदाणा चटणी खारी शेंगदाणे ,फुटाणे, लिंबू सरबत, रुमाल टोपी, कापड विक्री इ. स्टॉल लावण्यात आले लहान मुले बाजारातील व्यापा सारखे ओरडून आपला माल लवकरात लवकर कसा खपेल यासाठी रस्सीखेच सुरू होता. माल खरेदी करण्यासाठी वि. नि हायस्कूल मुले मुली यांनी खरेदीचा स्वाद खेतला गावातील ग्रामस्थ महीला बचत गट सरपंच सर्वपदाधिकारी वि. से सो चेरमन पोपट गडदे, महादेव गडदे, काकासो शिंगाडे, मा सरपंच सुनील वाघमोडे माजी सरपंच सुजाता माळी महेश माळी विशाल गुळिग, दशरथ गुळीग, राजू गुळीग, उज्वल गुळीग, अंकुश कारंडे, हणमंत माळी.जितू गुलीग,राजू माळी, अमोल जगधने दादा माने आबासो गुळीग ,शशी हातेकर, श्रीमंत गुळीग दशरथ गडदे समाधान माळी यासर्वानी बाल आनंद मेळाव्याचा आस्वाद घेतला.

उपस्थित सर्वांचे मुख्याध्यापक मुरलीधर गोडसे यांनी व उपस्थित सर्वांचे आभार मानले .बाल आनंद मेळाव्यासाठी विद्यार्थी पालक शिक्षकवृंद श्री राजेंद्र इकारे,श्री दिलीप बाबर ,श्री रेवनसिध्द बदडे,श्री दिंगबर पांढरे,श्री दत्तात्रय केंगार ,श्री शिवाजी गुळीग यांनी परिश्रम घेऊन बाल आनंद मेळावा यशस्वी पार पाडला.
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



