छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ शिवशिल्पाचे सांगोला येथे पारंपारीक वाद्यांच्या गजरात उत्साहात आगमन

0

सांगोला (प्रतिनिधी): शहरातील बहुचर्चित छत्रपती शिवाजी महाराज चौकातील नियोजित छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ शिवशिल्पाचे आगमन शुक्रवारी सांगोला शहरात झाले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ शिवशिल्पाची डीजे, डॉल्बी, बेंजो, हलगी यासह पारंपरिक वाद्यांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. ठिकठिकाणी सर्व समाज बांधवांनी शिवरायांच्या अश्वारूढ शिवशिल्पास पुष्पहार अर्पण करून मानवंदना दिली. सर्वधर्म समभाव जपत सर्वधर्मीयांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ शिवशिल्पावर पुष्पवृष्टी करत स्वागत केले.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ शिवशिल्पाच्या मिरवणुकीसाठी शहर व ग्रामीण भागातून आलेले शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तरुण, विद्यार्थी, महिला, अबालवृद्ध भगवे ध्वज हाती घेत घोषणाबाजी देत होते. या मिरवणुकीमध्ये ढोल पथक, घोडे, उंट, तोफ, मर्दानी खेळ, दांडपट्टा, भगवे ध्वज पथक, हालगी पथक, सजीव देखावे, नाशिक ढोल, शाहीर पथक, शिवकालीन देखावे व अनेक पारंपरिक नृत्य सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. शिवभक्तांचा ओसंडून वाहणारा उत्साह, मनामनात जागलेले शिवप्रेम अशा जल्लोषी वातावरणात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ शिवशिल्पाचे सांगोला शहरात शुक्रवारी आगमन झाल्यावर ग्रामदैवत श्री अंबिकादेवी मंदिरापासून भव्यदिव्य मिरवणुकीला प्रारंभ झाला. छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवाजी जय शिवाजी, तुमचं आमचं नात काय, जय भवानी जय शिवराय, या घोषणांनी परिसर दणाणून गेला. कार्यकर्त्यांच्या हातातील भगवे ध्वज भिरभिरल्यानंतर मिरवणूक पुढे सरकली. भीमनगर येथे जेसीबीच्या सहाय्याने फुलांची उधळण करीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ शिवशिल्पास पुष्पहार अर्पण करण्यात आला. चौकाचौकात अश्वारूढ शिवशिल्पाचे आगमन झाल्यानंतर कार्यकर्त्यांच्या उत्साहाला उधाण आले होते.

मिरवणूक व्हिडिओ 👇

https://youtu.be/aY89_02HV7w?si=9et4k7-DVUjhLKXS

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ शिवशिल्पाची श्री अंबिकादेवी मंदिर, राजमाता अहिल्यादेवी होळकर चौक, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर, साठेनगर, भीमनगर, वाढेगाव नाका, कडलास नाका, वासूद चौक, म.फुले चौक, स्टेशन रोड या मार्गावरून भव्य मिरवणूक काढण्यात आली. ठिकठिकाणी राजकीय नेते, विविध संस्था, बँका, सामाजिक संघटनांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ शिवशिल्पास पुष्पहार अर्पण करण्यात आला. ठिकठिकाणी सामाजिक संस्था आणि संघटनांच्या वतीने शिवभक्तांसाठी पाण्याची सोय करण्यात आली होती.

सर्वधर्म समभाव जपत सर्वधर्मीयांकडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ शिवशिल्पावर पुष्पवृष्टी करत स्वागत करण्यात आले. शहरातील कडलास नाका येथे मुस्लिम बांधवांकडून शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ शिवशिल्पाचे स्वागत करून छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये शिवप्रेमींसाठी सरबत वाटप करण्यात आले. अनेक ठिकाणीलां फुलांची उधळण करून क्रेनच्या साह्याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवशिल्पास पुष्पहार अर्पण करण्यात आला. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवशिल्पाच्या मिरवणुक मार्गावर पोलीस विभागाकडून चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

दीपक आबांनी धरला हलगीवर ठेका

पहा व्हिडिओ 👇🏻

https://youtu.be/utDlT-rXnEk?si=o_lzWr3Jh-08H6vH

डीवायएसपी विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली दोन पोलीस निरीक्षक यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस निरीक्षक असे १५ अधिकारी व ७० पोलीस कर्मचारी या मिरवणूक बंदोबस्तासाठी तैनात केले होते.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here