सांगोला (प्रतिनिधी): स्पोर्ट्स कराटे असोसिएशन सोलापूर यांच्या वतीने व कराटे डू. असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या मान्यतेने दिनांक 12 जानेवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजता वय 21 वर्षाखालील व 21 वर्षावरील सीनियर कराटे निवड चाचणी कराटे स्पर्धेचे आयोजन सांगोला येथे करण्यात येणार आहे.

या स्पर्धा वजन गटाप्रमाणे होतील या स्पर्धेतील निवड झालेले स्पर्धक दिनांक 17 व 18 रोजी अहिल्यानगर येथे होणाऱ्या होणाऱ्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धे करता सहभागी होतील.

ही स्पर्धा कॉमनवेल्थ कराटे फेडरेशन वर्ल्ड कराटे फेडरेशन कराटे इंडिया ऑर्गनायझेशनशी संलग्न आहे अशी माहिती स्पोर्ट्स कराटे डो. असोसिएशन सोलापूर चे अध्यक्ष जी के वाघमारे सर यांनी दिली. जिल्ह्यातील ज्या स्पर्धकांना या स्पर्धेमध्ये सहभाग घ्यायचा आहे त्यांनी 9970606909 या नंबर वर संपर्क साधावा.


सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



