माढा: रयत शिक्षण संस्थेचे कला व वाणिज्य महाविद्यालय माढा येथील राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर यांच्यामार्फत राज्यस्तरीय विविध प्रकारच्या शिबिरासाठी विद्यार्थ्यांच्या निवडी झालेल्या आहेत. त्यामध्ये पुणे विद्यापीठ येथे नॅशनल इंटिग्रेशन कॅम्प साठी कु. मनीषा बावळे हिची निवड झाली आहे.

तसेच नुकत्याच झालेल्या उत्कर्ष राज्यस्तरीय सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये कु. वैभवी राऊत या विद्यार्थिनींने महा महाविद्यालयाचं प्रतिनिधित्व करीत विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करून सर्वसाधारण विजेतेपद विद्यापीठ संघामार्फत मिळवलेलं आहे. तसेच 26 जानेवारीला मुंबई येथे होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाचे संचलन करण्यासाठी श्रेयस टिंगरे याची निवड झालेली आहे. त्याचबरोबर आव्हान 2026 आपत्ती व्यवस्थापन शिबिर डॉ. पंजाबराव देशमुख विद्यापीठ अकोला येथे होणार आहे.

या शिबिरासाठी महाविद्यालयाची कु. अर्पिता सरवदे,कु. श्रद्धा मुंगसे व छत्रपती थोरात या विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूरचे कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर रयत शिक्षण संस्थेच्या मध्य विभागाचे चेअरमन मा. संजीव पाटील एन.एस.एस.चे संचालक डॉ. राजेंद्र वडजे महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉक्टर घनश्याम हराळे, उपप्राचार्य प्रा. अशोक लोंढे एन.एस.एस .चे कार्यक्रम अधिकारी डॉ. दत्तात्रय काळेल व महाविद्यालयातील विकास समितीचे सदस्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



