एन.एस.एस.मधून विविध कौशल्य आत्मसात करता येतात -डॉ.जे. जी. जाधव

0

माढा : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर व रयत शिक्षण संस्थेचे, कला व वाणिज्य महाविद्यालय माढा यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबिर केवड या ठिकाणी उत्साहामध्ये पार पडत आहे. या शिबिराचे उद्घाटन रयत शिक्षण संस्थेचे माजी सचिव व जनरल बॉडी सदस्य मा. प्राचार्य डॉ. जे. जी. जाधव यांच्या शुभहस्ते झाले.

याप्रसंगी बोलत असताना त्यांनी कॉलेज जीवनामध्ये एन.एस.एस. मधून अनेक प्रकारची कौशल्य विकसित करता येतात व ती कौशल्य जीवनामध्ये यश मिळवण्यासाठी उपयुक्त ठरतात. त्यापैकी एक कौशल्य म्हणजे बोलण्याचे व व्यक्तिमत्व विकास करण्याचे कौशल्य होय .आपल्याकडे बौद्धिकता किती प्रमाणात आहे यापेक्षा आपण परिस्थितीचे गांभीर्य ओळखून कशा पद्धतीने आपले कौशल्य वापरून दुसऱ्यांना पटवून देऊ इच्छितो यावरती सध्याच्या काळात व्यक्ती यश मिळवू शकते. तसेच जीवन जगत असताना सतत पॉझिटिव्ह विचार मनामध्ये ठेवून कार्य केले तर जीवनामध्ये यश नक्की मिळू शकते असे प्रतिपादन केले. या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख उपस्थिती मध्ये महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य प्रो. डॉ.घन:शाम हराळे व केवड गावचे उपसरपंच मा. नितीन पाडोळे हे होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावचे सरपंच प्रतिनिधी मा.राजेंद्र पाटील हे होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक एन. एस.एस कार्यक्रम अधिकारी प्रो. डॉ. दत्तात्रय काळेल यांनी केले. तर सूत्रसंचालन प्रा. समाधान कदम यांनी केले. तसेच कार्यक्रमाचे आभार प्रा. संकल्प बारबोले यांनी मानले. या कार्यक्रमास उपप्राचार्य प्रा. अशोक लोंढे व एन. एस. एस. समिती मधील सदस्य डॉ. संतोष बाबरे, प्रा. प्रसाद पवार, प्रा.श्रद्धा मस्के प्रा. सुषमा राऊत श्री. सुहास जवंजाळ यांच्यासह बहुसंख्य ग्रामस्थ ,प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here