सांगोला येथे माणगंगा परिवार मॅरेथॉन 2026 उत्साहात संपन्न

0

सांगोला (प्रतिनिधी): माणगंगा परिवार अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी, सांगोला या संस्थेच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेली “माणगंगा परिवार मॅरेथॉन 2026” ही स्पर्धा सांगोला येथे मोठ्या उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणात पार पडली. या मॅरेथॉन स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रातून विविध गटांतील हजारो धावपटूंनी सहभाग नोंदवला, त्यामुळे सांगोला शहरात क्रीडा आणि आरोग्याचा उत्सव साजरा झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

ही मॅरेथॉन शालेय गट (३ कि.मी. मुले–मुली), ५ कि.मी. खुला गट (महिला–पुरुष) आणि १० कि.मी. खुला गट (महिला–पुरुष) अशा विविध गटांमध्ये घेण्यात आली.

३ कि.मी. शालेय गट

मुलींमधून प्रथम सानिका शरद महानवर (जांभुळवाडी, जत), द्वितीय प्रगती नानासो सरक (जांभुळवाडी, जत) व तृतीय राजेश्वरी संभाजी कीरगत (डोंगरगाव, सांगोला) यांनी क्रमांक पटकावले.

मुलांमधून प्रथम साहिल महिपती वाघमोडे (जत), द्वितीय शिवम मुकेश शिवशरण (जत) व तृतीय सुरज पांडुरंग खोत (कोगनोळी, कवठेमंकाळ) यांनी यश संपादन केले.

५ कि.मी. खुला गट

महिलांमधून प्रथम आरोही प्रदीप पाठमास (सोलापूर), द्वितीय रिद्धी लक्ष्मण सप्रे (श्रीगोंदा, नगर) व तृतीय पूजा भाऊसो मासाळ (शिरभावी) यांनी क्रमांक मिळवले.

पुरुषांमधून प्रथम साहिल अनिल गायकवाड (मार्डी, माण), द्वितीय अजित चंद्रकांत चौगुले (वाढेगाव, सांगोला) व तृतीय रविराज दत्तात्रय नरळे (बालाजी नगर) यांनी यश मिळवले.

१० कि.मी. खुला गट

महिलांमधून प्रथम सानिका परमेश्वर ऐवळे (पंढरपूर), द्वितीय सुरेखा रामा मातने (श्रीगोंदा) व तृतीय अक्षरा शिवाजी पवार (बालाजी नगर, मंगळवेढा) यांनी बाजी मारली.

पुरुष गटात प्रथम प्रवीण बबन कांबळे (सांगली), द्वितीय सुशांत प्रकाश सरगर (कोळे, ता. सांगोला) व तृतीय अक्षय पांडुरंग खोत (कोगनोळी) यांनी क्रमांक पटकावले.

सर्व गटातील विजेत्यांना मानगंगा परिवार अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी, सांगोला यांच्यावतीने ट्रॉफी, मेडल, प्रमाणपत्र, गुलाब पुष्प व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी सहाय्यक पोलीस आयुक्त मा. भरत शेळके साहेब, मानगंगा परिवाराचे संस्थापक अध्यक्ष व नूतन उपनगराध्यक्ष श्री नितीन आबासाहेब इंगोले, चेअरमन सौ. अर्चनाताई इंगोले, व्हाईस चेअरमन श्री सुखदेव रंधवे, श्री सचिन इंगोले, संचालक श्री विवेक घाडगे सर, श्री महादेव शिंदे, श्री विजय वाघमोडे, तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अक्षय मुढे उपस्थित होते.

यावेळी आपुलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री राजेंद्र यादव, सांगोल्यातील सुप्रसिद्ध डॉक्टर डॉ. शैलेश डोंबे, ॲड. गजानन भाकरे, डॉ. निरंजन केदार, पत्रकार अमेय मस्के, विज्ञान महाविद्यालयाचे क्रीडा संचालक श्री विजय पवार सर, श्री अविनाश इंगोले, कडलास मॅरेथॉनचे संयोजक श्री टापरे सर, वेलनेस कोच खटकाळे मॅडम, तसेच तालुक्यातील विविध प्रशालेतील क्रीडा शिक्षक व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सदर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मानगंगा परिवाराचे सर्व हितचिंतक, अधिकारी व कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन हास्यसम्राट श्री जितेश कोळी सर व श्री विवेक घाडगे सर यांनी केले. एकूणच मानगंगा परिवार मॅरेथॉन 2026 ही स्पर्धा आरोग्य, क्रीडा व सामाजिक बांधिलकीचा संदेश देत मोठ्या उत्साहात पार पडली.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here