सांगोला ( प्रतिनिधी): नवनिर्वाचित नूतन पंचायत समिती सदस्य राणीताई सुरज पाटील यांची सांगोला पंचायत समितीच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला यांच्या वतीने उत्साही वातावरणात सत्कार करण्यात आला.

संस्थाध्यक्षा श्रीमती कौशल्यादेवी शिंदे मॅडम यांनी नूतन पंचायत समिती सदस्य राणीताई पाटील, संस्था संचालिका वृषालीताई पाटील व सुरज सुभाषनाना पाटील यांचा संस्था सचिव निलकंठ शिंदे सर यांनी शाल ,श्रीफळ देऊन सत्कार केला.

संस्थेच्या वतीने त्यांच्या पुढील सामाजिक ,राजकीय कारकीर्दीस शुभेच्छा देण्यात आल्या. उषा सपाटे सह यावेळी संस्थेचे सदस्य उपस्थित होते.


सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



