फिनिक्स प्रायमरी इंग्लिश मेडीयम स्कूल नाझरे मध्ये शिवजयंतीनिमित्त ‘शिवतेज 2026’ दिमाखदार सोहळा संपन्न

0

नाझरा (प्रतिनिधी): फिनिक्स प्रायमरी इंग्लिश मेडीयम स्कूल नाझरे मध्ये शिवजयंती अत्यंत उत्साहात, शिस्तबद्ध वातावरणात साजरी करण्यात आली. यंदाच्या संपूर्ण कार्यक्रमास *‘शिवतेज’* असे नाव देण्यात आले होते. भगव्या पताकांनी सजलेला परिसर, पारंपरिक वेशभूषेतील विद्यार्थी आणि उपस्थित मान्यवर यामुळे वातावरण भारावून गेले होते.

कार्यक्रमाच्या *अध्यक्षस्थानी शाळेच्या चेअरमन डॉ ऐश्वर्या सोनवणे* या विराजमान होत्या. कार्यक्रमासाठी *प्रमुख पाहुणे म्हणून सांगोला तालुका युवासेना प्रमुख सागर पाटील चोपडी पंचायत समिती सदस्य अजय सरगर , तसेच नारीशक्ती ग्रामसभा अध्यक्षा सुलभाताई देशपांडे* यांची विशेष उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे सागरदादा पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. त्यानंतर चेअरमन डॉ. ऐश्वर्या सोनवणे आणि सुलभाताई देशपांडे यांच्या हस्ते भावपूर्ण शिवआरती करण्यात आली. “जय भवानी, जय शिवाजी”च्या जयघोषांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.

यावेळी मान्यवरांनी शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची, स्वराज्य स्थापनेची आणि स्त्रीसन्मानाच्या त्यांच्या धोरणांची आठवण करून दिली. विद्यार्थ्यांनी त्यांच्या आदर्शांवर चालण्याचा निर्धार व्यक्त केला.

कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे विद्यार्थ्यांनी सादर केलेली दमदार शिवगर्जना आणि शिवप्रतिज्ञा. तसेच शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित गीतांवर सादर केलेले नृत्य उपस्थितांच्या मनाचा ठाव घेणारे ठरले.

याशिवाय महिलांसाठी सांस्कृतिक पारंपरिक वेशभूषेत रॅम्प वॉक तसेच नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विविध पारंपरिक पोशाखांमधून महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा, स्त्रीशक्ती आणि अभिमान यांचे सुंदर दर्शन घडले. या उपक्रमामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली आणि ‘शिवतेज’ या नावाला साजेसा तेजस्वी आविष्कार साकार झाला.

कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्राचार्य सोनाली सरगर मॅडम, सहाय्यक शिक्षक रायचुरे मॅडम व प्राजक्ता ढोले मॅडम यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन शुभांगी गायकवाड मॅडम यांनी केले, तर आभार प्रदर्शन सोनाली सरगर मॅडम यांनी व्यक्त केले.एकूणच ‘शिवतेज’ हा सोहळा विद्यार्थ्यांमध्ये स्वराज्य, स्वाभिमान, स्त्रीसन्मान आणि राष्ट्रभक्तीची ज्योत प्रज्वलित करणारा ठरला.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here