घेरडीचे ग्रामपंचायत सदस्य श्रीनिवास करे यांना राज्यस्तरीय ‘युवा प्रेरणा पुरस्कार’ प्रदान

0

घेरडी (प्रतिनिधी): सामाजिक कार्याचा वसा आणि तरुण पिढीला दिशा देण्याचे काम करणाऱ्या, घेरडी गावचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आणि मायाक्कादेवी महिला क्रेडिट सोसायटीचे सर्वेसर्वा श्रीनिवास करे यांना सी.बी.एस. न्यूज मराठी डिजिटल नेटवर्क महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने ‘राज्यस्तरीय युवा प्रेरणा पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले.

श्रीनिवास करे यांनी आपल्या सामाजिक आणि सहकार क्षेत्रातील कार्याचा ठसा संपूर्ण परिसरात उमटवला आहे. तरुणांनी स्वतःचे उद्योग उभे करावेत यासाठी ते सदैव प्रयत्नशील असतात. घेरडीमध्ये स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज अभ्यास केंद्र (Library) उभारण्याचा त्यांचा मानस असून, त्यादृष्टीने त्यांची पावले पडत आहेत. मायाक्कादेवी महिला क्रेडिट सोसायटीच्या माध्यमातून त्यांनी अनेक नवउद्योजकांना व्यवसायासाठी आणि शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसायासाठी जनावरे खरेदी करण्यास सुलभ कर्ज उपलब्ध करून दिले आहे.तसेच वारकरी संप्रदायातील कार्यक्रमांमध्ये त्यांचा हिरीरीने सहभाग असतो. गावातील सर्व जयंती उत्सव साजरे करताना ते नेहमीच पुढाकार घेतात.

सी.बी.एस. न्यूज मराठी डिजिटल नेटवर्कने श्रीनिवास करे यांच्या या बहुआयामी कार्याची दखल घेत त्यांना राज्यस्तरीय युवा प्रेरणा पुरस्काराने सन्मानित केले. या पुरस्कारामुळे त्यांच्यावर संपूर्ण सांगोला तालुक्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

समाजहित आणि तरुणांच्या प्रगतीसाठी काम करण्याची प्रेरणा या पुरस्कारामुळे अधिक प्रबळ झाली आहे. भविष्यात घेरडीच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध राहीन.”

— श्रीनिवास करे (ग्रामपंचायत सदस्य, घेरडी)

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here