विद्यार्थ्यांच्या डिजिटल शिक्षणाला मिळणार गती
कडलास (प्रतिनिधी):विद्यार्थ्यांना आधुनिक युगाचे शिक्षण मिळावे आणि ग्रामीण भागातील मुले तंत्रज्ञानात मागे राहू नयेत, या उदात्त हेतूने दत्तनगर (कडलास) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला गीता कॉम्प्युटर्स, सांगोला यांच्या वतीने संगणक भेट देण्यात आला.

हा संगणक कै. अपर्णा अरुण वाघमोडे यांच्या स्मृतीप्रत्यर्थ त्यांचे सुपुत्र अवधूत वाघमोडे व अतुल वाघमोडे यांच्या हस्ते शाळेला सुपूर्द करण्यात आला.आईच्या आठवणी कायमस्वरूपी जिवंत ठेवण्यासाठी सामाजिक बांधिलकीतून वाघमोडे बंधूंनी हा निर्णय घेतला. केवळ उपकरणाची भेट देऊन न थांबता, मुलांच्या प्रत्यक्ष शिक्षणासाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे.

गीता कॉम्प्युटर्सतर्फे दर शनिवारी एक तास शाळेतील मुलांना संगणक प्रशिक्षणासाठी विशेष मार्गदर्शक (अतुल वाघमोडे किंवा अनुभवी प्रशिक्षक) पाठवण्यात येणार आहे. यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोफत संगणक साक्षर होण्याची संधी मिळणार आहे.

या कार्यक्रमाप्रसंगी शाळेचे गायकवाड गुरुजी व पवार मॅडम उपस्थित होत्या. वाघमोडे परिवाराने दाखवलेल्या या दातृत्वाबद्दल शिक्षकांनी कृतज्ञता व्यक्त केली. “संगणकामुळे मुलांच्या शिक्षणात नाविन्य येईल आणि त्यांचा आत्मविश्वास वाढेल,” असा विश्वास यावेळी शिक्षकांनी व्यक्त केला.
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



