महाविकास आघाडीत सारं काही आलबेल आहे ना? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. कारण एकीकडे ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यात तणाव पाहायला मिळाला. हा तणाव आता मिटला असून जागावाटपही लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. पण अंतिम जागावाटप जाहीर होण्याआधीच महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या
आज शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी आज शेकापच्या अधिकृत उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. जयंत पाटील यांच्याकडून आतापर्यंत एकूण 6 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. सोबतच शेकाप महाविकास आघाडीचा उमेदवार असेल अस जाहीर केलं आहे.
उमेदवारांची नावे खालील प्रमाणे
- अलिबाग – चित्रलेखा पाटील
- पनवेल – बाळाराम पाटील
- उरण – प्रितम पाटील
- पेण – अतुल म्हात्रे
- लोहा कंधार – शामसुंदर शिंदे
- सांगोला – बाबासाहेब देशमुख
आपण महाविकास आघाडी सोडणार नाही
“आम्ही प्रागतिक आघाडी म्हणून लढतो आहोत. आम्ही आघाडीतून बाहेर जातो, अशी चर्चा आहे. पण त्या प्रकारची कोणतेही कृत्य आमच्याकडून होणार नाहीत. बाळाराम पाटील यांच्या नेतृत्वात शेकापचे आमदार काम करणार आहेत”, अस देखील जयंत पाटील यांनी जाहीर केलं आहे.
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक