ठळक बातम्या – 05/03/2026

0

✒️ इराणी युद्धनौकेवर अमेरिकेच्या पाणबुडीचा हल्ला, ८७ ठार

▪️श्रीलंकेच्या किनाऱ्याजवळ झालेल्या हल्ल्यात जहाजाला जलसमाधी

✒️ अयातुल्ला खामेनींचे उत्तराधिकारी म्हणून पुत्र मोज्तबा यांची निवड ?

✒️ हल्ल्यात मुंबईच्या तरुणाचा मृत्यू, आतापर्यंत ३ भारतीय ठार

✒️ गृहनिर्माण संस्थांच्या अकृषिक कराची थकबाकी माफ

▪️महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधानसभेत माहिती

✒️ नितीश कुमार जाणार राज्यसभेवर ?

✒️ आठवले, तावडे यांना राज्यसभेची उमेदवारी

▪️उमेदवार यादीत भाजपचे धक्कातंत्र

✒️ राज्यसभा निवडणूक बिनविरोध होणार

▪️मविआकडून शरद पवार यांना उमेदवारी

▪️पवारांच्या उमेदवारीला काँग्रेस, ठाकरे गटाचा पाठिंबा

 

✒️ राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा मुद्दा संपला – जयंत पाटील –

▪️आम्ही महाविकास आघाडीसोबतच !

✒️ हरवलेल्या महिला शोधण्यासाठी राज्यात स्पेशल सेल – मुख्यमंत्री

✒️ बांबू लागवडीला प्रोत्साहन

▪️प्लास्टिकचा वापर कमी करण्यावर भर ग्रामीण रोजगार वाढविण्यासाठी प्राधान्य -नाईक

✒️ अवैध वाळू वाहतुकीवर आता कारवाई – चंद्रशेखर बावनकुळे

✒️ शाळा सुविधांसाठी निधीचा उपयोग -दादा भुसे

▪️विविध स्रोतातून निधी उभारणी

✒️ राज्यभरात उन्हाचा चटका

▪️थंडीने गाशा गुंडाळला; आणखी काही दिवस उष्णतेचा इशारा

✒️ एसटीच्या ‘शिवनेरी’ धावणार राज्यभरात

▪️२०० अत्याधुनिक व्होल्वो बसेसची खरेदी

✒️ एमएचटी सीईटीच्या अर्जात करता येणार दुरुस्ती

▪️११ लाख ४२ हजार विद्यार्थ्यांची नोंदणी

✒️ शेतकऱ्यांना अडीच हजार कोटींची भरपाई द्या!

▪️शेतकरी नेते राजू शेट्टी यांची सरकारकडे जोरदार मागणी

✒️ संघर्षादरम्यान इराणमध्ये ४.३ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप

▪️अणुचाचण्यासंबंधी तर्कवितर्क

✒️ सेन्सेक्स ११२३ अंकांनी कोसळला

✒️ ५६ पैशांनी घसरून रुपया ९२.०५

✒️ भारतातील शहरे ‘गॅस’वर

▪️कतारने एलएनजी उत्पादन थांबवले

✒️ वानखेडेवर आज अहमदाबादचे तिकीट ?

▪️मुंबईत रंगणाऱ्या उपांत्य सामन्यात इंग्लंडला नमवून अंतिम फेरी गाठण्याचे भारताचे ध्येय

✒️ धडाकेबाज विजयासह न्यूझीलंड अंतिम फेरीत

▪️पराभवामुळे दक्षिण आफ्रिकेचे आव्हान संपुष्टात

▪️ईडन गार्डन्सवर फिन ॲलनचे शतकी वादळ

✒️ सांगोला न्यायालयामध्ये विधीज्ञ कक्ष या नूतन इमारतीचे भूमिपूजन समारंभ संपन्न

✒️ अवैध वाळू वाहतूक कारवाईदरम्यान भरारी पथकावर हल्ला; दोन जणांवर गुन्हा

✒️ इराण-इस्त्रायल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सांगोल्याची तीन कुटुंबे दुबईत अडकली; सर्वजण सुखरूप

✒️ सांगली-परळी- सांगली रेल्वेस स्थानकावर थांबा द्याः अशोक कामटे संघटना

✒️ सांगोला तालुक्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अडचणीत; स्पर्धेतील गती मंदावली…

▪️मनरेगा’च्या नामांतरानंतर योजना रखडली;जुनी कामे कायम अन् नव्यांना ब्रेक

✒️ घरपट्टी, पाणीपट्टी व गाळा भाडे वसुलीसाठी सांगोला नगरपरिषदेची विशेष मोहीम

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here