सांगोला: (प्रतिनिधी): जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सांगोला नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष तथा माणगंगा परिवाराचे संस्थापक अध्यक्ष नितीन (आबासाहेब) इंगोले आणि माणगंगा परिवार को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या चेअरमन सौ. अर्चनाताई नितीन इंगोले यांच्या संकल्पनेतून ‘माणगंगा नारी गौरव सोहळा २०२६’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा उद्या बुधवार, दि. ११ मार्च २०२६ रोजी दुपारी २:३० वाजता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सभागृह, सांगोला येथे पार पडणार आहे.

‘कर्तृत्व, स्वाभिमान आणि स्वावलंबन’ या संकल्पनेवर आधारित या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश समाजातील महिलांमध्ये आर्थिक साक्षरतेसह विविध विषयांवर जागरूकता निर्माण करणे हा आहे. माणगंगा परिवार अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटीच्या वतीने आयोजित या उपक्रमातून महिलांच्या सामाजिक आणि आर्थिक सक्षमीकरणावर भर दिला जाणार आहे.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सांगोल्याच्या तहसीलदार बाळुताई भागवत, केळकर हॉस्पिटलच्या डॉ. सौ. सुपर्णा केळकर आणि कृषी अधिकारी सौ. दिपाली जाधव भूषविणार आहेत.
तसेच, कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सांगोल्यातील विविध नगरसेविका आणि मान्यवर महिला पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत, त्यामध्ये: सौ. राणीताई माने, सौ. वैशाली सावंत, सौ. गोदाबाई बनसोडे, सौ. आशादेवी यावलकर, सौ. छाया मेटकरी, सौ. सीमा सरगर, सौ. शोभा फुले, सौ. श्रद्धा साबळे, सौ. दिव्यानी दौंडे, सौ. वैशाली झापके, सौ. सुजाता केदार-सावंत, सौ. अनिता केदार, सौ. तनुजा एरंडे आणि जिल्हा परिषद सदस्या सौ. शोभा खटकाळे यांचा समावेश आहे.

या सोहळ्यात आपल्या कार्यक्षेत्रात ठसा उमटवणाऱ्या खालील महिलांना ‘माणगंगा नारी गौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे:वैद्यकीय: डॉ. सौ. सुपर्णा केळकर, क्रीडा: सौ. अश्विनी माने, सामाजिक: सौ. ज्योती महांकाळ, नव उद्योजिका: सौ. मनिषा लिंगाडे व सौ. प्रीती खडतरे, कायदा व सामाजिक: ॲड. राजेश्वरी केदार, पोलीस सेवा: सौ. शबनम शेख (महिला सहाय्यक पोलीस फौजदार), सांस्कृतिक व साहित्य: सौ. अनुपमा गुळमिरे व सौ. योजना मोहिते, कला व मनोरंजन: सौ. ललिता चौधरी (कलाकार/मॉडेल) व सौ. नम्रता भोसले (रंगभूषाकार)

केवळ सत्कार सोहळाच नव्हे, तर महिलांसाठी मनोरंजनाची खास मेजवानीही यावेळी असणार आहे. सुप्रसिद्ध निवेदक श्री. भारत मुडे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध खेळ आणि स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून उपस्थित महिलांना आनंदाचा अनुभव घेता येईल.
या विशेष कार्यक्रमाला सांगोला शहर व परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन नितीन (आबासाहेब) इंगोले आणि सौ. अर्चनाताई इंगोले यांनी केले आहे.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



