माढा महाविद्यालयात ‘आपत्ती व्यवस्थापन व नेतृत्व विकास’ कार्यशाळा संपन्न

0

माढा (जि. सोलापूर) : रयत शिक्षण संस्थेचे कला व वाणिज्य महाविद्यालय, माढा आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजनेच्या (NSS) अंतर्गत ‘आपत्ती व्यवस्थापन व नेतृत्व विकास’ या विषयावर तीन दिवसीय कार्यशाळेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. ही कार्यशाळा दि. १२ मार्च ते १४ मार्च २०२६ या कालावधीत महाविद्यालयात पार पडली.

कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मा. डॉ. राजेंद्र वडजे (संचालक, राष्ट्रीय सेवा योजना विभाग, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ) उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य प्रो. डॉ. घन:श्याम हराळे होते, तसेच उपप्राचार्य प्रा. अशोक लोंढे तर प्रमुख उपस्थिती म्हणून डॉ. संजय मुजमुले, डॉ. वीरभद्र दंडे (जिल्हा समन्वयक, राष्ट्रीय सेवा योजना विभाग) उपस्थित होते.

या कार्यशाळेत डॉ. सुभाष पाटील, मा, सिद्धेश गोफने, डॉ. सुजित साळुंखे , मा. विजय माने, प्रा.परशुराम कोरे यांनी विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाची मूलभूत माहिती, नेतृत्व विकास, प्राथमिक उपचार (First Aid), CPR प्रशिक्षण, रक्तस्त्राव नियंत्रण, जखमांची काळजी, अग्निसंकट व्यवस्थापन तसेच अग्निशामक यंत्राचा वापर याबाबत सैद्धांतिक आणि प्रात्यक्षिक मार्गदर्शन करण्यात आले. तसेच बचावकार्य व आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी घ्यावयाच्या दक्षता उपायांबाबत तज्ज्ञांनी सविस्तर माहिती दिली.

कार्यशाळेच्या समारोप कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. अनिल मुंगुसकर (विभागीय समन्वयक, राष्ट्रीय सेवा योजना, माढा विभाग, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ) उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कार्यक्रमाचे संयोजक व कार्यक्रम अधिकारी प्रो. डॉ. दत्तात्रय काळेल हे होते. याशिवाय समितीतील सदस्य डॉ.संतोष बाबरे, प्रा. संकल्प बारबोले, प्रा.समाधान कदम, प्रा. प्रसाद पवार, प्रा. श्रद्धा मस्के, प्रा. अपर्णा निकंबे व श्री सुहास जवंजाळ उपस्थित होते.

या तीन दिवसांच्या कार्यशाळेत विविध महाविद्यालयातील स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांमध्ये आपत्ती व्यवस्थापनाबाबत जागरूकता निर्माण होऊन नेतृत्व कौशल्यांचा विकास होण्यास मदत झाली.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here