प्रतिनिधी (शशिकांत कोळी): सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक सोसायटी जिल्हा अध्यक्ष पदी घेरडी गावचे अमोगसिद्ध कोळी गुरुजी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे सांगोला तालुक्यातील कोळी समाज. घेरडी गावासह , सांगोला तालुक्याला प्रथमच अमोगसिद्ध कोळी गुरुजी च्या रूपाने जिल्हा अध्यक्ष पदाचा बहुमान मिळाल्या ने सांगोला तालुक्यात सर्व समाज्याचे आनंदाचे वातावरण निर्माण झाले कारण योग्य माणसाला त्याच्या कामाची पोच पावती मिळाली.

सोलापूर जिल्हा सोसायटी मध्ये शिक्षक समितीची बैठक सपन्न झाली. त्या बैठकीत अमोगसिद्ध कोळी गुरुजी यांच्या नावाचा शिक्कामोर्तब करण्यात आला.त्यांचा प्रवास एक सामान्य कार्यकर्ता ते जिल्हा अध्यक्ष असा राहिला आहे..

म्हणूच अश्या व्यक्ती चा सत्कार होणे गरजेचे आहे म्हणून आखिल भारतीय होलार समाज संघटना महाराष्ट्र राज्य शाखा सांगोला यांच्या वतीने होलार समाज ऑफिस मध्ये त्यांचा सत्कार शाल श्रीफळ देऊन करण्यात आला व होलार समज्या च्या वतीने पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

याप्रसंगी शिवाजी गेजगे सर, अखिल भारतीय होलार समाज तालुका अध्यक्ष, परमेश्वर गेजगे जिल्हा संपर्क प्रमुख, पत्रकार शशिकांत कोळी, तसेच सांगोला तालुक्यातील अखिल भारतीय होलार समाज संघटनेचे कार्यकर्ते बहुसंखेने उपस्थित होते.

कोळी समाजास , घेरडी गावास , व सांगोला तालुक्यास कोळी गुरुजी च्या रूपाने प्रथम मान मिळाला
-परमेश्वर गेजगे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार सामाजिक न्याय विभाग सांगोला तालुका सरचिटणीस.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



