सांगोला (प्रतिनिधी): कोल्हापूर– सोलापूर–कोल्हापूर मंगळवेढा मार्गे या प्रवासात दरपत्रक पूर्ववत करावेत अशी मागणी शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेने एसटी प्रशासनाकडे केली आहे.

एका वर्षापासून मंगळवेढा मार्गे सोलापूरला जाणाऱ्या बसेस या सोलापुरात दमानीनगर रेल्वे पूलाच्या पुनर्बांधणी करिता देगाव मार्गे बंद करण्यात आल्या होत्या , त्यामुळे पर्यायी विजापूर बायपास मार्गे बाळे, सोलापूर असा प्रवास करत होते त्यामुळे प्रवाशांना ज्यादा तिकिटाचा भार सोसावा लागत होता पण प्रवाशांनी व इतर संघटनांनी मागणी करून

सोलापूर शहरातील दमानीनगर रेल्वे पूलाचे काम होईपर्यंत शहरालगत असणाऱ्या देगाव, अवंती नगर , पुना नाका मार्गे सोलापूर शहरात हा रस्ता 15 दिवसापासून वाहतुकीसाठी खुला केल्याने प्रवाशांच्या अंतर व वेळ वाचत आहे.पण इतर विभागातून येणाऱ्या एसटी कोल्हापूर, शिराळा व कोकणातून येणाऱ्या एसटी बसेस या पूर्वीप्रमाणे एक टप्पा जादा तिकिटाचे आकारणी करत आहेत त्यामुळे प्रवाशांना नाहक आर्थिक भुर्दंड बसत आहे , तसेच काही बसेस या मार्गाचा वापर करीत नाही तरी सोलापूर विभागीय एसटी महामंडळ कार्यालयाने मंगळवेढा मार्गे जाणाऱ्या –येणाऱ्या एसटी बसना पूर्ववत तिकीट दर ठेवावेत

व हा मार्ग वापरण्यास सक्तीचे करावे अशी मागणी प्रवाशातून होत आहे तरी एसटी प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन सदर सुधारित मार्ग वापरण्यास व तिकीट कपातीस संबंधितांना तात्काळ सूचना, आदेश द्याव्यात अशी मागणी शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेने केली आहे.

शहीद अशोक कामटे संघटनेच्या सूचनेप्रमाणे जिल्हा नियंत्रक विभागाला सदरची बाब कळविणार आहे , अनेक चालक, वाहकांना या पर्यायी मार्गाची माहिती नसल्याने हा मार्ग वापरत नसावेत,सांगोला कंट्रोलरला अंमलबजावणी करण्याकरिता या मार्गावरील संबंधित चालक, वाहकाला सूचना ,माहिती देण्यात येईल.
विकास पोफळे, आगारप्रमुख सांगोला

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



