श्रीराम नवमी निमित्त वासुद येथे कुस्तीचा थरार; लाखोंच्या इनामांसह जंगी मैदान रंगले

0

सांगोला (प्रतिनिधी ): श्रीराम नवमीच्या पावन पर्वानिमित्त वासुद येथे पारंपरिक मल्लविद्येचा भव्य सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. गुरुवार, दि. 26 मार्च 2026 रोजी दुपारी 4 वाजता सुरू झालेल्या या जंगी कुस्ती मैदानात शंभर रुपयांपासून ते तीन हजार रुपयांपर्यंतच्या अनेक लहान-मोठ्या कुस्त्या रंगल्या. एकूण सुमारे पाच लाख रुपयांचे इनाम मल्लांना वितरित करण्यात आल्याने संपूर्ण परिसरात कुस्तीचा जल्लोष पाहायला मिळाला.

या मैदानाचे प्रमुख आकर्षण ठरलेल्या तब्बल ₹1,00,000 इनामाच्या कुस्तीत नेपाळचे पैलवान देवा थापा यांनी हिमाचल प्रदेशच्या नदीम चौहान यांच्यावर मात करत विजेतेपद पटकावले. तसेच सांगलीचे पैलवान विशाल शेळके यांनी आटपाडीच्या रणजीत आगलावे यांच्यावर विजय मिळवत प्रेक्षकांची दाद मिळवली.इतर झालेल्या कुस्त्यांमध्ये खवासपूरचे अर्जुन चव्हाण यांनी म्हसवडच्या प्रसाद फुकळे यांचा पराभव केला. खवासपूरचे करण खटके यांनी दत्ता बोडरे यांच्यावर मात केली, तर पियुष वाडेकर (खवासपूर) यांनी आटपाडीच्या भैय्या खरात यांना चितपट केले.

काही कुस्त्या अत्यंत चुरशीच्या ठरल्या. कामतीचे सुलेखान शेख व बामणीचे विनोद शिनगारे तसेच कुंभारीचे सुशांत शेजुळ व खवासपूरचे विकास निंबाळकर यांच्यातील कुस्त्या बरोबरीत सोडवण्यात आल्या, ज्यामुळे प्रेक्षकांनी समाधान व्यक्त केले.इतर निकालांमध्ये खवासपूरचे गणेश आवताडे यांनी आटपाडीच्या यश देवकते यांचा पराभव केला, तर मानेगावचे ज्ञानेश्वर सावंत यांनी खवासपूरच्या विकास कोळी यांच्यावर विजय मिळवला.

या भव्य मैदानाचे आयोजन वासुद येथील जुने हायस्कूल मैदानावर करण्यात आले होते. तसेच लहान व मोठ्या कुस्त्यांचे सामने हनुमान मंदिर परिसरात दुपारी 1 वाजल्यापासूनच रंगले होते, ज्याला गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.कार्यक्रमास वस्ताद कृष्णा शेंडगे (सर), दगडू चौगुले, बजवळकर बुवा बडरे, दादा व्हनमाने, सहदेव लेंडवे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. विशेष म्हणजे सांगोला पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी स्वतः आखाड्यात उतरून पंच म्हणून जबाबदारी पार पाडली. त्यांच्या सहभागामुळे कार्यक्रमाची शोभा अधिक वाढली.

कुस्ती निवेदनाची जबाबदारी क्रीडा भूषण पुरस्कारप्राप्त पैलवान कृष्णा शेंडगे (सर) यांनी प्रभावीपणे पार पाडली. यावेळी सागर पाटील, यशराजे साळुंखे पाटील, अतुल पवार, योगेश खटकाळे, गुंडा दादा खटकाळे ,मोहन बापू आलदार, डॉ.शिवराज भोसले, डॉ.विजय बंडगर,डॉ.महेश राऊत,डॉ.महादेव जगताप यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

भीमराव सावंत, प्रकाश केदार, वसंतराव शिंदे, शहाजी पाटील, विठ्ठल नाना केदार, सुभाष शिंदे, पोपट भोरे, अरविंद केदार, राहुल भोरे, सुनील भोरे, दत्ता केदार, प्रकाश भोरे, सुनील केदार, अशोक गोरे, अशोक शास्त्री, गोपाळ मराळ, राहुल केदार, गोपी केदार, डॉ. निरंजन केदार, अंकुश सावंत, मधुकर पवार यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेतले.

एकंदरीत, वासुद येथील या भव्य कुस्ती मैदानाने श्रीराम नवमीचा उत्सव मोठ्या उत्साहात व दिमाखात साजरा करत पारंपरिक मल्लविद्येला नवे बळ दिले. गावकऱ्यांनी व परिसरातील कुस्तीप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here