सांगोल्यात आलदर हॉस्पिटलच्या वतीने मुलांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन; तज्ज्ञांकडून तपासणीसह मोफत औषधोपचार!

0

सांगोला (प्रतिनिधी):वाढत्या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर आणि मुलांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याच्या उद्देशाने, सांगोला येथील सुप्रसिद्ध आलदर हॉस्पिटल (बालरुग्णालय व नवजात शिशु अतिदक्षता विभाग) यांच्या वतीने एक भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

हे शिबिर सोमवार, दिनांक ३० मार्च २०२६ रोजी सकाळी ११:३० ते दुपारी १२:३० लिटील मिलेनियम प्रिस्कूल, चिंचोली रोड, सांगोला संपन्न होणार आहे.

या शिबिराचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये नुकत्याच जन्माला आलेल्या बाळापासून ते १८ वर्षांपर्यंतच्या मुलांची तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत मोफत तपासणी केली जाईल. ग्रामीण व शहरी भागातील मुलांमध्ये वाढणारे आजार, कुपोषण आणि शारीरिक व्याधींवर वेळेत उपचार मिळावेत, हा यामागचा मुख्य उद्देश आहे.

या शिबिरात तज्ज्ञ बालरोग तज्ज्ञांमार्फत रुग्णांची सखोल तपासणी केली जाणार आहे. तपासणीनंतर गरज असलेल्या सर्व रुग्णांना हॉस्पिटलतर्फे मोफत औषधे दिली जातील. हे शिबिर महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री आयुष्मान भारत योजना अंतर्गत राबवले जात आहे. ज्या बालकांना शस्त्रक्रिया किंवा पुढील मोठ्या उपचारांची गरज आहे, त्यांना शासकीय योजनेतून मदत मिळवून दिली जाईल.शिबिराचा लाभ घेणाऱ्या पालकांनी सोबत आयुष्मान भारत कार्ड, गोल्डन कार्ड (उपलब्ध असल्यास) आणणे अनिवार्य आहे

“मुलांचे आरोग्य हीच राष्ट्राची संपत्ती आहे. पालकांनी आपल्या पाल्यांच्या किरकोळ आजारांकडे दुर्लक्ष न करता या मोफत शिबिराचा लाभ घ्यावा,” असे आवाहन आलदर हॉस्पिटल प्रशासनाकडून करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ९०२९० ४४००९ या क्रमांकावर संपर्क साधावा.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here