सांगोला –कराड –दापोली बस सेवेला मंजुरी; शहीद अशोक कामटे संघटनेच्या पाठपुराव्याला यश 

0

सांगोला (प्रतिनिधी) सांगोल्यातून थेट कराड,दापोली कोकणामध्ये जाण्याकरिता बस सेवा सुरू करावी या आग्रही मागणीचे पत्र शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेच्यावतीने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांच्याकडे केली होती बस सेवा सुरू करण्यास मंजुरी मिळालेली आहे.

सांगोला –कराड –दापोली– सांगोला ही बस सेवा मंगळवार दि. 14 एप्रिल पासून नियमित सुरू होणार आहे या बसचे थांबे व मार्ग नाझरे ,आटपाडी, करगणी, भिवघाट, खानापूर, विटा, कडेगाव, कराड, पाटण, कोयनानगर, चिपळूण, खेड, दापोली असणार आहे. सदरची सेवा देण्याकरता सांगोला आगार तत्पर आहे.

या बस सेवेचे ऑनलाइन आगाऊ आरक्षण महामंडळाच्या संकेतस्थळावर सुरू करण्यात आले आहे. सदर बस सेवेमुळे कोकण– पश्चिम महाराष्ट्राला जोडणारी अतिशय महत्त्वपूर्ण बससेवा ठरणार असल्याने प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सांगोला – दापोली सकाळी 8.00 सांगोल्यातून प्रस्थान करेल व दापोलीतून सकाळी 6 वाजता निघेल. तरी या बस सेवेस या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी या बसने प्रवास करावा असे आवाहन शहीद अशोक कामटे संघटनेच्या वतीने देण्यात आली.

सदर बस सेवा सुरू होण्याकरता परिवहन मंत्री ,विभागातील परिवहन राज्य महामंडळाचे सर्व अधिकारी, आगार प्रमुख विकास पोफळे सांगोला यांचेकडे सातत्याने शहीद अशोक कामटे सामाजिक संघटनेने या मागणीचा पाठपुरावा केला त्यास सर्वांचे सहकार्य लाभले. अशोक कामटे संघटनेच्या या सामाजिक कार्याचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here