सांगोला ( प्रतिनिधी ): राष्ट्बंधू राजीव दीक्षित पुरस्कार मेडशिंगी ता. सांगोला येथील श्री बसवेश्वर झाडबुके यांना युवकमित्र ह भ प बंडातात्या कराडकर यांचे शुभहस्ते देऊन गौरविण्यात आले. ११ हजार रुपये रोख, मानपत्र, सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असून श्री बसवेश्वर झाडबुके हे शहीद राजीव दीक्षित यांचे सोबत सक्रिय राहून स्वदेशीचे काम करोत होते. अतिशय साधी राहणी व स्वदेशीचा विचार यामुळे ते परिसरात चर्चेत आहेत. व्यसनमुक्तीच्या माध्यमातून ते शाळा महाविद्यालय या ठिकाणी जाऊन व्यसनमुक्तीचा व स्वदेशीचा प्रचार करतात.

व्यसनमुक्त युवक संघ, महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून दिला जाणारा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज व राष्ट्रबंधू राजीव दीक्षित पुरस्कार किल्ले साल्हेर जि. नाशिक गडाच्या पायथ्याशी मान्यवरांना देऊन सन्मानित करण्यात आले.

जेष्ठ कीर्तनकार युवकमित्र ह भ प बंडातात्या कराडकर संस्थापित व्यसनमुक्त युवक संघ, महाराष्ट्र यांच्या माध्यमातून युवकांना व्यसनमुक्त बनविण्यासाठी गेली पंचवीस वर्षांपासून प्रबोधनाच्या माध्यमातून संस्कार शिबीरे आयोजित केली जातात. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शने पावन झालेल्या ठिकाणी ही संस्कार शिबीरे आयोजित करून युवकांना व्यसनमुक्तीचे व राष्ट्रप्रेमाचे धडे दिले जातात त्याचबरोबर समाजातील आदर्श कार्यपद्धती करणाऱ्या व्यक्तींचा पुरस्कार देऊन सन्मान केला जातो.

छत्रपती संभाजी महाराज पुरस्कार खेड जि. पुणे येथील ऍड पोपटराव तांबे पाटील यांना अहिल्यानगर येथील जेष्ठ इतिहास संशोधक प्रा बी. जी.शहा यांचे हस्ते देऊन सन्मानीत करण्यात आले. अकरा हजार, मानपत्र व सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचे स्वरूप आहे. या वेळी उद्योगरत्न पुरस्कार सिंधुदुर्ग येथील श्री बबनराव बोडेकर, कृषिरत्न पुरस्कार वाई तालुक्यातील सुरूर येथील श्री संतोष जाधव यांना देण्यात आला तर क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे श्रो संताजी गोरे यांना सन्मानीत करण्यात आले.यावेळी वीरसेनानी सूर्याजी काकडे यांचे वंशज संतोष आबा काकडे अध्यक्षस्थानी होते. यावेळी सोलापूर, सातारा, पुणे, अहिल्यानगर, नाशिक, बीड या भागातील संघटनेचे शिलेदार व पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक श्री विलासबाबा जवळ यांनी केले तर आभार श्री शहाजी काळे यांनी मानले.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



