नागेश भोसले सर यांच्या नेतृत्वात सलग तेरा वर्ष सुरू आहे उपक्रम
पंढरपूर येथील नवरंगे बालक आश्रमामध्ये सालाबाद प्रमाणे याही वर्षी सांगोला येथील नागेश भोसले सर व त्यांच्या सहकाऱ्यांनी अनाथ मुलांना आवश्यक असणारे साहित्य भेट देत अनोखी दिवाळी साजरी केली.
अनाथालयाच्या अधिक्षिका राजश्री गाडे मॅडम व सहायक श्री. डफळे सर यांनी अनाथालयातील विविध उपक्रमाबाबत माहिती दिली. दिवाळी फराळ आणि इतर साहित्य यांच्या मदतीबद्दल माहिती दिली. अनाथ आश्रमामध्ये एकूण 45 मुली आहेत. त्यांना आवश्यक मुग, मटकी, वाटाणा व छोले खरेदीसाठी १० हजार रुपये रोख मदत देण्यात आली.
सांगोला विद्यामंदिर पर्यवेक्षक श्री.मस्तूद सर ,सुखानंद हळ्ळीसागर सर, श्री.अमोल रणदिवे सर, श्री.किरण घोंगडे सर, श्री .संतोष लवटे सर, कु.अंजली करपे, मृणाली अडसूळ, सुप्रिया भुईटे,भाग्यश्री करपे, परिवर्तन फाउंडेशनचे अध्यक्ष ओंकार साळुंखे, स्वप्नील पाटील आणि सौरभ पाटील यांनी आर्थिक योगदान दिले.नागेश भोसले सर यांचे नेतृत्वाखाली गेली तेरा वर्षे सलगपणे हा उपक्रम सुरू आहे.
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक