ठळक बातम्या – 24/06/2026

0

✒️ अखेर पाऊस आला..!

▪️ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात ‘यलो अलर्ट’

▪️विदर्भातील ४ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

▪️नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

✒️ एसटी कर्मचाऱ्यांच्या ‘डीए’मध्ये ५ टक्के वाढ

✒️ पाच वर्षात ४४ हजार मेगावॉट वीज खरेदीचे करार – मुख्यमंत्री

✒️ वन्यजीव हल्ले, मृतांच्या नातेवाईकांना नोकरी

▪️राज्यातील संघर्ष रोखण्यासाठी ‘रॅबिट फार्मिंग’ आणि हरिण संवर्धनावर भर

✒️ पोलिसांविरुद्ध दोन वर्षात १० हजार तक्रारी

▪️३७१ प्रकरणांत गुन्हे दाखल

✒️ प्रियकराच्या मदतीने भावी पतीचा काढला काटा

▪️लोहगड किल्ल्यावर अपघात नव्हे खून

▪️केतनचा पाय घसरल्याचा केला बनाव

▪️फोटोच्या बहाण्याने खोल दरीत ढकलले

✒️ समान नागरी कायद्याची प्रक्रिया लवकरच

▪️गृहराज्यमंत्री कदम यांची माहिती, नाशिकची ट्रिपल तलाक लक्षवेधी गाजली

✒️ सीजेपी ही अतिरेक्यांची बी टीम – धर्मेंद्र प्रधान

✒️ देशात महिलांवरील अत्याचारात महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर

▪️२०२४ मध्ये महिला अत्याचाराच्या ४७, ९५४ नोंदी

✒️ सावरकरांना मरणोत्तर भारतरत्न देण्याचा ठराव केंद्राकडे का पाठवला नाही ?

▪️सुधीर मुनगंटीवारांचा सरकारला सवाल

✒️ टीईटीत हिजाब, बुरखा, ओढणीला परवानगी

✒️ भवानीपूर निवडणूक याचिकाः कलकत्ता उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी भावाच्या भाजप संबंधांची केली जाहीर कबुली

▪️ईव्हीएम व सीसीटीव्ही फुटेज सुरक्षित ठेवण्याचे दिले आदेश

✒️ फ्रान्स आणि ब्रिटनमध्ये उष्णतेची लाट

▪️दोन्हीकडे ‘रेड अलर्ट’ जारी, ४० जणांचा मृत्यू

✒️ मी नेतान्याहूंसोबतचे प्रश्न झटपट सोडवतो – ट्रम्प

✒️ पाकिस्तानने लादेनला लपविले होते याचे विस्मरण नको

▪️सिनेटर्सची व्हॅन्स यांच्यावर टीका

✒️ औषधे स्वस्त हवी !

▪️नीती आयोगाची अपेक्षा; चीनवरील अवलंबित्वाबद्दल इशारा

✒️ भारत-अमेरिका व्यापार चर्चा सुरू

▪️नव्या कराच्या पार्श्वभूमीवर करार पुनर्बाधणी

✒️ भारताचा इस्रायलबरोबर करार

✒️ महिमा मेस्सीचा, वर्षाव विक्रमांचा!

▪️ऑस्ट्रियाला नमवून गतविजेत्या अर्जेंटिनाची थाटात बाद फेरीत धडक

✒️ सांगोला विद्यामंदिरमध्ये १२ वीच्या गुणवंतांचा गौरव

▪️शिस्त, समर्पण आणि योग्य निर्णय हाच यशाचा मंत्र -डॉ. बसवराज शिवपुजे

✒️ सांगोला नगरपरिषदेत आंतरराष्ट्रीय एकल महिला दिन उत्साहात साजरा

✒️ शुक्रवारी मंगळवेढ्यात ३४ वी पाणी संघर्ष परिषदः तालुक्यातील शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावेः आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख

✒️ सांगोला नगरपरिषदेकडून शेतकऱ्यांना मिळणार मोफत कंपोस्ट खत

▪️तालुक्यातील शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन

✒️ हार-तुरे नकोत, विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य द्या

▪️बहुजन नेते बापूसाहेब ठोकळे यांचे वाढदिवसानिमित्त अनोखे आवाहन

✒️ सांगोला तालुक्यातील शेतकरी विजेच्या लपंडावाने त्रस्त उकाड्याने नागरिकांची होरपळ, उभी पिके धोक्यात

✒️ सांगोला तालुक्यात पाऊस पडेना, ढेकूळ फुटेना मशागती थांबल्या, पेरणीही थांबणार; दहा हजार हेक्टर क्षेत्रावर संकट

✒️ लाखो वारकऱ्यांना सेवा सुविधा पुरविणाऱ्या महूद ग्रामपंचायतीला शासनाकडून दरवर्षी अनुदान मिळावे

▪️देवस्थान कमिटीचे अध्यक्ष कैलास खबाले यांची मागणी

✒️ आरक्षण निश्चितीत लोकसंख्या व प्रभावी प्रतिनिधित्वाचा विचार करा

▪️बहुजन मुक्ती पार्टीचे राज्य निवडणूक आयोगाला निवेदन

✒️ सांगोला रस्ते घोटाळ्याविरोधात वाहिद आतार यांचे आझाद मैदानात आमरण उपोषण सुरू

▪️उच्चस्तरीय चौकशी समिती नेमण्याची ठाम मागणी

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here