प्रतिनिधी (सांगोला) : दिवाळी दिवाळी सणाच्या निमित्ताने सांगोला शहरातील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या श्री अंबिका देवी मंदिर येथे यंदा मातृभूमी सेवा प्रतिष्ठानाच्या पुढाकारातून आणि ग्रामदैवत श्री अंबिका देवी मंदिराच्या वतीने “सांगोला दीपोत्सव २०२४” या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. नागरिकांनी या उत्साहात सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांकडून केले आहे.
दिवाळी पाडवाच्या मुहूर्तावर शनिवारी दिनांक २ नोव्हेंबर २०२४ रोजी सायंकाळी ६.३० ते ८.३० वेळी सांगोला शहरातील ग्रामदैवत श्री अंबिका देवी मंदिर, विद्यामंदिर हायस्कूल जवळ, सांगोला येथे दीपोत्सव आयोजित केला आहे. मातृभूमी सेवा प्रतिष्ठानाच्या माध्यमातून दरवर्षी सांगोला येथे दीपोत्सवाचे आयोजन केले जाते. त्याच प्रथेनुसार यंदाही दीपोत्सवाचे आयोजन केले आहे. कार्यक्रमस्थळी दीपोत्सवासाठी आवश्यक पणत्यांची व्यवस्था आयोजकांकडून केलेली आहे. तरीही नागरिक स्वतः दिवे आणूनही यात सहभागी होवू शकतात.
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक