माढा : रयत शिक्षण संस्थेच्या कला व वाणिज्य महाविद्यालय, माढा येथे राष्ट्रीय सेवा योजना व आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष अंतर्गत ‘पंढरीची निर्मल वारी आली माढा महाविद्यालयाच्या दारी’ या उपक्रमानिमित्त प्रेरणादायी कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमात वारकरी संप्रदायाची परंपरा, वारीचे आध्यात्मिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि स्वच्छतेचे महत्त्व तसेच संतांच्या विचारांचे आजच्या पिढीसाठी असलेली गरज याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी उपप्राचार्य प्रा. अशोक लोंढे यांनी प्रस्ताविकातून उपक्रमाची भूमिका स्पष्ट केली. प्रमुख वक्ते फुलचंद नागटिळक यांनी संत गाडगेबाबा महाराजांच्या वेशात वारकरी संप्रदायातील समता, बंधुभाव, सेवाभाव, शिस्त, मानवतेचा संदेश आणि स्वच्छता विद्यार्थ्यांसमोर प्रभावीपणे मांडला. त्यांनी संतांच्या विचारांचे अनुकरण करून चारित्र्यसंपन्न व जबाबदार नागरिक बनण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र. प्राचार्य प्रा. डॉ. घन:शाम हराळे हे होते. अध्यक्षीय भाषणात त्यांनी वारकरी परंपरेतून विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी, नैतिक मूल्ये आणि संस्कार यांचा अंगीकार करावा, असे प्रतिपादन केले.
यावेळी इतिहास विभागप्रमुख डॉ. रविराज कांबळे, आयक्यूएसी समन्वयक डॉ. नामदेव शिंदे, कनिष्ठ विभागाचे पर्यवेक्षक प्रा. कैलास शिंदे, प्रा. समाधान कदम, प्रा. प्रसाद पवार, प्रा. मयूर चव्हाण महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे आभार राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमधिकारी प्रा. डॉ. दत्तात्रय काळेल यांनी मानले. कार्यक्रमास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



