उध्दव ठाकरे यांची तोफ आज सांगोला येथे धडाडणार!

0

शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत. कोल्हापूर येथे महालक्ष्मीचे दर्शन घेऊन त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा प्रारंभ केला आहे. रविवार दि.१० नोव्हेंबर रोजी दु. ३.०० वाजता सांगोला शहरातील न्यू इंग्लिश स्कूलच्या मैदानावर महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे प्रचार सभा घेऊन महाविकास आघाडीतील कार्यकर्त्यांना आणि शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार आहेत.

 

सांगोला विधानसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांना उमेदवारी दिली आहे. रविवार दि.१० नोव्हेंबर रोजी दुपारी ३.०० वाजता सांगोला शहरातील न्यू इंग्लिश स्कूलच्या मैदानावर महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे प्रचार सभा घेणार आहेत. या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या दौऱ्याकडे आणि भाषणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यांच्या सभेची जय्यत तयारी सुरू असून सभेस येणाऱ्या गर्दीला कोणत्याही प्रकारे त्रास होणार नाही, अशा पद्धतीने नियोजन करण्यात येत आहे.

 

तरी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे, काँग्रेसचे जेष्ठ नेते पी.सी. झपके, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष डॉ. धनंजय पवार व महाविकास आघाडी सांगोला तालुका यांच्या वतीने करण्यात आले आहे.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here