सांगोला विधानसभा मतदारसंघात पोस्टल मतदान सुरू

0

253 सांगोला विधानसभा मतदारसंघासाठी मंगळवार दिनांक 12 नोव्हेंबर पासून टपाली मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी पोस्टल मतदान करण्यासाठी तहसील कार्यालय येथे पोस्टल मतदान सुरू झाल्याचे माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर गवळी व नोडल अधिकारी पोस्टल मतदान श्रीमती दिपाली जाधव यांनी दिली.

या ठिकाणी टपाली मतदान साक्षांकन करण्यासाठी राजपत्रित अधिकारी वसंत फुले सहाय्यक गटविकास अधिकारी व प्रकाश नलवार उपनिबंधक यांची नेमणूक केली आहे तसेच मतदान केंद्राध्यक्ष संतोष लोंढे व सुभाष रोकडे तसेच मतदान अधिकारी उत्तम नवले यांची नियुक्ती केले असून त्या ठिकाणी 253 विधानसभा साठी 1 व जिल्हा अंतर्गत विधानसभा साठी 1 व जिल्हा बाहेरील विधानसभा साठी 1 मत मतपेटी ठेवलेल्या आहेत या ठिकाणी आज एकूण 18 मतदारांनी मतदान केले आहे टपाली मतदान दिनांक 19/11/24 पर्यंत कार्यालयीन वेळेत करण्यात येणार आहे.

आज सांगोला 253 साठी 13 मतदारांनी टपाली मतदान हक्क बजावल्याचे मीडिया नोडल अधिकारी मिलिंद सावंत पंचायत समिती सांगोला यांनी सांगितले आहे

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here