ज्या गावात जितका लीड त्या गावात तितकी झाडे लावणार, आमदार बाबासाहेब देशमुख यांचा स्तुत्य उपक्रम

0

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाले असले तर काही ज्येष्ठ नेत्यांचा पराभव झाला आहे. काय झाडी का डोंगर या डायलॉगमुळे राज्यात प्रसिद्ध झालेले शिवसेना शिंदे गटाचे सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांचा शेतकरी कामगार पक्षाच्या डॉ. बाबासाहेब देशमुख या युवा नेत्याने पराभव केला. निवडणुक जिंकताच देशमुख यांनी एका अनोख्या स्तुत्य उपक्रमाची घोषणा केली आहे, त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

 

बाबासाहेब देशमुख यांनी पहिल्यांदाच निवडणूक लढवली आणि जिंकलीही. ज्या गावात मतांचा जितका लीड मिळाला आहे, त्या गावात तितकी झाडे लावण्याच्या उपक्रमाची घोषणा बाबासाहेब देशमुख यांनी केली आहे. पर्यावरण रक्षण ही काळाजी गरज असून, झाडे लावा झाले जगवा हा संदेश देण्यासाठी हा नवीन उपक्रम त्यांनी हाती घेतल्याचं सांगितलं जात आहे.

महाविकास आघाडीकडून सांगोल्याची जागा शेकाप पक्षाला सुटेल अशी अपेक्षा होती. मात्र, महाविकास आघाडीतून ही जागा शिवसेना ठाकरे गटाला सुटली. त्यामुळं बाबासाहेब देशमुख यांनी देखील निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. आघाडीत बिघाडी झाल्याने याचा फायदा आमदार शहाजीबापू पाटील यांना होईल अशी चर्चा होती पण जनतेने बाबासाहेब देशमुख यांच्या बाजूने कौल दिला.

 

डॉ. बाबासाहेब देशमुख यांना 1 लाख 16 हजार 256, तर त्यांचे विरोधक अॅड. शहाजीबापू पाटील यांना 90 हजार 870 मते पडली आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार दीपक साळुंखे यांना 50 हजार 962 मते मिळाली आहेत. बाबासाहेब देशमुख यांनी गेल्या निवडणुकीत झालेल्या डॉ. अनिकेत देशमुख यांच्या पराभवाचे उठे काढले असल्याची चर्चा आहे.

 

सांगोला हा शेकापचा बालेकिल्ला आहे. शेकापचे दिवंगत गणपराव देशमुख यांनी तब्बल 11 वेळा या मतदारसंघाचे नेतृत्व केले आहे. मात्र 2019 च्या विधानसभा निवडणुकीत शेकापचा हा गड ढासळला. शिवसेनेचे शहाजीबापू पाटील हे शेकापच्या डॉ. अनिकेत देशमुख यांचा पराभव करुन मतदारसंघातून विजयी झाले होते. मात्र, आता 2024 च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा शेकापनं आपला या मतदारसंघावर लाल बावटा फडकावला आहे.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here