प्रो. डॉ. दत्तात्रय काळेल यांच्या ‘आंतरराष्ट्रीय संघटना व जागतिक शासन’ पुस्तकाचे प्रकाशन संपन्न

0

सांगोला (प्रतिनिधी): रयत शिक्षण संस्थेच्या कला व वाणिज्य महाविद्यालय, माढा येथील राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रो. डॉ. दत्तात्रय मारुती काळेल यांच्या ‘आंतरराष्ट्रीय संघटना व जागतिक शासन’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा नुकताच महाविद्यालयात उत्साहात संपन्न झाला.

या पुस्तकाचे प्रकाशन रयत शिक्षण संस्थेच्या मध्य विभागाचे चेअरमन मा. संजीव पाटील व माढ्याचे माजी आमदार मा. धनाजीतात्या साठे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य डॉ. सदाशिव कदम, जनरल बॉडी सदस्य प्रा. नानासाहेब लिगाडे, माढा शहराच्या नगराध्यक्षा सौ. मीनलताई साठे, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. घनश्याम हराळे, उपप्राचार्य प्रा. अशोक लोंढे, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

प्रो. डॉ. दत्तात्रय काळेल यांच्या या पुस्तकामुळे राज्यशास्त्र विषयाच्या अभ्यासकांना आंतरराष्ट्रीय संघटना आणि जागतिक शासनव्यवस्थेचा अभ्यास करण्यासाठी महत्त्वपूर्ण संदर्भ उपलब्ध होणार आहे. त्यांच्या या शैक्षणिक योगदानाबद्दल शिक्षण व शैक्षणिक क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

विशेष म्हणजे, प्रो. डॉ. दत्तात्रय काळेल हे मूळचे खिलारवाडी, ता. सांगोला येथील रहिवासी असून त्यांच्या या यशामुळे खिलारवाडीसह सांगोला तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण आहे.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here